Home | Sports | From The Field | IPL: Fastest half-century of the eighth; Overall, by 102 runs on the scorecard

IPL: ईशानचे वेगवान अर्धशतक; काेलकात्यावर 102 धावांनी मात; काेलकात्याचा सहावा पराभव

वृत्तसंस्था | Update - May 10, 2018, 09:15 AM IST

सामनावीर ईशान किशनच्या (६२) वेगवान अर्धशतकाच्या बळावर गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सने ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये धडाके

 • IPL: Fastest half-century of the eighth; Overall, by 102 runs on the scorecard

  काेलकाता - सामनावीर ईशान किशनच्या (६२) वेगवान अर्धशतकाच्या बळावर गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सने ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये धडाकेबाज माेठ्या विजयाची नाेंद केली. मुंबईने यजमान काेलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. मुंबईने १०२ धावांनी सामना जिंकला.यासह मुंबईने विजयी हॅट््ट्रिक साजरी केली. यामुळे मुंबईला पाचव्या विजयाची नाेंद करता अाली.

  प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने काेलकात्यासमाेर विजयासाठी २११ धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने १८.१ षटकांत अवघ्या १०८ धावांवर अापला गाशा गुंडाळला. काेलकात्याच्या खेळाडूंना समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्यामुळे टीमचा पराभव झाला.


  पांड्या बंधूंचे माेलाचे याेगदान : मुंबईच्या विजयात हार्दिक अाणि कृणाल या पांड्या बंधूंनी माेलाचे याेगदान दिले. त्यांनी धारदार गाेलंदाजी करताना प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. यासह त्यांनी काेलकात्याला राेखले.


  सामनावीर ईशानचे दुसरे वेगवान अर्धशतक : मुंबईच्या युवा फलंदाज ईशान किशनने (६२)अायपीएलमध्ये दुसरे वेगवान अर्धशतक ठाेकले. त्याने १७ चेंडूंत पाच चाैकार व चार षटकारांसह ५० धावा काढल्या. लाेकेशने १४ चेंडूंत ६ चाैकार व ४ षटकारांसह ५० धावा काढल्या अाहेत.

  पुढील स्लाईडवर पहा, धावफलक...

 • IPL: Fastest half-century of the eighth; Overall, by 102 runs on the scorecard
 • IPL: Fastest half-century of the eighth; Overall, by 102 runs on the scorecard

Trending