आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तिलचे शानदार शतक; न्यूझीलंडकडून तिसऱ्यांदा पाकिस्तान टीमचा सुफडासाफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन- कर्णधार विलियम्सनच्या नेतृत्वाखाली यजमान न्यूझीलंडने अापल्या घरच्या मैदानावरील दबदबा कायम ठेवताना शुक्रवारी पाकिस्तान टीमचा धुव्वा उडवला. यजमान न्यूझीलंडने मालिकेत सलग पाचव्या विजयाची नाेंद केली. न्यूझीलंडने १५ धावांनी पाचव्या वनडेत पाकवर विजय संपादन केला. यासह न्यूझीलंडने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा ५-० ने सुफडासाफ केला. यजमानांचा मार्टिन गुप्तिल सामनावीर अाणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याची वनडे सिरीजमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली.   


सलामीवीर मार्टिन गुप्तिलच्या (१००) झंझावाती शतकाच्या बळावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पाकसमाेर विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात मॅट हेन्री (४/५३) व सॅटनरच्या (३/४०)  धारदार गाेलदंाजीमुळे पाकचा २५६ धावांवर धुव्वा उडाला.  


पाकची दाणादाण

यजमान न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने पाचव्या अाणि शेवटच्या वनडे सामन्यात अापल्या घरच्या मैदानावर धारदार गाेलंदाजी केली. त्यामुळे पाकच्या टीमची दाणादाण उडाली. त्याने दहा षटकांत ५३ धावा देत ४ गडी बाद केले. सॅटनरने ३, फर्ग्युसनने २ अाणि ग्रँडहाेमने १ विकेट घेतली.  

 

गुप्तिलचे शतक 
मालिकावीर अाणि सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मार्टिन गुप्तिलची पाचव्या वनडेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने शानदार शतक ठाेकले. त्याने १२६ चेंडूंत १० चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे १०० धावा काढल्या.