Home | Sports | From The Field | PL 2018 Delhi Daredevils Vs Kolkata KnightRiders DD Vs KKR Live And Updates In Eden Garden

कुलदीप, नरेनने उडवला दिल्लीचा धुव्वा; काेलकात्याने 71 धावांनी जिंकला सामना, केकेआरचा दुसरा विजय

वृत्तसंस्था | Update - Apr 17, 2018, 12:58 AM IST

सामनावीर नितीश राणाच्या (५९) झंझावाती अर्धशतकानंतर कुलदीप यादव (३/३२) अाणि सुनील नरेनने (३/१८) केलेल्या धारदार गाेलंदाजी

 • PL 2018 Delhi Daredevils Vs Kolkata KnightRiders DD Vs KKR Live And Updates In Eden Garden

  काेलकाता- सामनावीर नितीश राणाच्या (५९) झंझावाती अर्धशतकानंतर कुलदीप यादव (३/३२) अाणि सुनील नरेनने (३/१८) केलेल्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्सने साेमवारी अायपीएलमध्ये शानदार दुसरा विजय संपादन केला. दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता संघाने स्पर्धेतील अापल्या चाैथ्या सामन्यात गाैतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला. काेलकाता टीमने घरच्या मैदानावर ७१ धावांनी शानदार विजयाची नाेंद केली. काेलकात्याचा हा दुसरा विजय ठरला. दुसरीकडे दिल्लीच्या टीमला तिसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.


  ईडन गार्डनवर काेलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २०० धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने १४.२ षटकांत अवघ्या १२९ धावांत अापला गाशा गुंडाळावा लागला. दिल्लीकडून ऋषभ पंत (४३) अाणि मॅक्सवेल (४७) यांनी एकाकी झंुज दिली. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता अाला नाही. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार गंभीरने ८ धावांचे याेगदान दिले. टीममधील अाठ फलंदाजांना धावांचा दुहेरी अाकडाही पार करता अाला नाही.

  कुलदीप, नरेनने घेतल्या प्रत्येकी ३ विकेट
  खडतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला झटपट गाशा गुंडाळावा लागला. सुनील नरेन अाणि कुलदीप यादवने धारदार गाेलंदाजी करताना दिल्लीचा धुव्वा उडवला. त्यांनी सामन्यात प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. त्यामुळे दिल्लीच्या टीमला अवघ्या १४.२ षटकांमध्ये झटपट पॅव्हेलियन गाठावे लागले. काेलकात्याकडून

  पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

 • PL 2018 Delhi Daredevils Vs Kolkata KnightRiders DD Vs KKR Live And Updates In Eden Garden
 • PL 2018 Delhi Daredevils Vs Kolkata KnightRiders DD Vs KKR Live And Updates In Eden Garden
 • PL 2018 Delhi Daredevils Vs Kolkata KnightRiders DD Vs KKR Live And Updates In Eden Garden

Trending