आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली -टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाणि सुरेश रैना यांच्यात सध्या एकमेकांना मागे टाकण्याची चांगलीच शर्यत रंगत अाहे. यातूनच गंभीर दुखापतीतून सावरलेल्या सुरेश रैनाने तुफानी खेळी करताना काेहलीला सर्वाधिक धावांमध्ये पिछाडीवर टाकले.
दुखापतीमुळे पहिल्या दाेन सामन्यांना मुकणाऱ्या रैनाने (५४) चेन्नईकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. यासह त्याने अायपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा पल्ला गाठला. अाता त्याच्या नावे सर्वाधिक ४ हजार ६५८ धावांची नाेंद झाली.
त्याने हा पल्ला १६५ सामन्यांतून गाठला. यामध्ये एका शतकासह ३२ अर्धशतकांचा समावेश अाहे. बंगळुरूचा कर्णधार विराट काेहली दुसऱ्या स्थानी अाहे. त्याच्या नावे ४ हजार ६४९ धावा अाहेत. त्याने १५४ सामन्यांतून हा पल्ला गाठला. यामध्ये चार शतकांसह ३२ अर्धशतके अाहेत. यादरम्यान त्याने ४०३ चाैकार अाणि १६७ षटकार ठाेकले अाहेत. त्याला सर्वाधिक धावांमध्ये दुसरे स्थान गाठता अाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.