आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसाेटी- अार.अश्विनच्या फिरकीने यजमान दक्षिण अाफ्रिका संघावर ‘संक्रांत’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंच्युरियन- टीम इंडियाच्या अार. अश्विनने (३/९०) शनिवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत शानदार गाेलंदाजी केली.त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकल्याने यजमान अाफ्रिकेवर संक्रांत अाेढवली. त्यामुळे अाफ्रिकेला  दिवसअखेर  ६ गड्यांच्या माेबदल्यात पहिल्या डावात २६९ धावा काढता अाल्या. मार्कराम (९४) अाणि हाशिम अामलाचा (८२) माेठ्या खेळीचा प्रयत्न अपुरा ठरला. सलामीच्या विजयाने अाफ्रिका संघ १-० ने अाघाडीवर अाहे. अाता दुसऱ्या कसाेटीतील विजयाच्या इराद्याने अाफ्रिका टीम मैदानावर उतरली अाहे. मात्र, टीमच्या अाघाडीच्या फलंदाजांना पहिल्या दिवशी फारशी समाधानकारक खेळी करता अाली नाही. भारताकडून अश्विनने ३ गडी बाद केले. तसेच ईशांत शर्माने एक विकेट घेतली. 


नाणेफेक जिंकून यजमान दक्षिण अाफ्रिका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डुप्लेसिसचा हा निर्णय सलामीच्या एल्गर (३१) अाणि मार्करामने (९४) याेग्य ठरवला.त्यांनी टीमला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. यामुळे यजमान टीमला घरच्या मैदानावर चांगली सुरुवात करता अाली. 

 

अार. अश्विनचा दबदबा

 अश्विनने सामन्यात विकेटचे खाते उघडले. त्याने सलामीची जाेडी फाेडली. त्याने एल्गरला मुुरली विजयकरवी झेलबाद केले. अश्विनने ३९ षटकांत ९० धावा देताना ३ बळी घेतले.

 

अामलाचे अर्धशतक 
अाफ्रिकेकडून हाशिम अामलाने शानदार अर्धशतक ठाेकले. त्यामुळे टीमच्या धावसंख्येला गती मिळाली. त्याने १५३ चेंडूंत ८२ धावा काढल्या. यात १४ चाैकारांचा समावेश अाहे. त्याने  मार्करामसाेबत दुसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी केेली. त्यामुळे  धावसंख्येला गती मिळाली.

 

मार्करामचे शतक हुकले 
सलामीवीर मार्करामचा दुसऱ्या कसाेटी सामन्यात शतक झळकावण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. त्याने ९४ धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या शतकाला अश्विनने हुलकावणी दिली. त्याने १५० चेंडूंचा सामना करताना १५ चाैकारांच्या अाधारे ९४ धावा काढल्या. त्याला अश्विनने पार्थिव पटेलकरवी झेलबाद केले. त्यामुळे त्याचे शतकाचे स्वप्न भंगले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...

बातम्या आणखी आहेत...