आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० मालिका : राेहितची सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बराेबरी; टीम इंडियाचा मालिका विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्टल- युवा सलामीवीर राेेहित शर्माच्या (१००) नाबाद शतकाच्या बळावर टीम इंडियाने रविवारी यजमान इंग्लंडवर मालिका विजय संपादन केला. भारताने मालिकेतील तिसऱ्या अाणि निर्णायक टी-२० सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. भारताने ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली. यादरम्यान नाबाद १०० धावांसह राेहित शर्माने सर्वाधिक शतकांच्या मुन्रोच्या विश्वविक्रमाशीही बराेबरी साधली. राेहित हा सामनावीर अाणि मालिकावीरचा मानकरी ठरला. 


इंग्लंडने घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून भारतासमाेर विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. राेहितने षटकार ठाेकून भारताला १८.१ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात विजय मिळवून दिला. संघाच्या विजयात कर्णधार विराट काेहलीने ४३ अाणि हार्दिकने नाबाद ३३ धावांचे महत्त्वाचे याेगदान दिले. त्यामुळे भारताला झटपट विजयाची नाेंद करता अाली. 


धाेनीचा विश्वविक्रम 
धाेनीने विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने एका टी-२० सामन्यात पाच झेल घेण्याचा पराक्रम गाजवला. अशी कामगिरी करणारा ताे पहिला यष्टिरक्षक ठरला. त्याने जेसन राॅयसह हेल्स, माेर्गन, बैयरस्ट्राे अाणि प्लंकेटची झेल घेतली. 


अष्टपैलू हार्दिक 
भारताचा युवा खेळाडू हार्दिकने सामन्यात अष्टपैलू खेळी केली. त्याने गाेलंदाजी करताना चार गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीत नाबाद ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यातूनच त्याला भारताच्या विजयात माेलाचे याेगदान देता अाले. 


राेहितचे झंझावाती शतक 
राेहित शर्माने ५६ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे नाबाद १०० धावांची खेळी केली. यासह त्याने टी-२० मधील तिसरे शतक साजरे केले. यातूनच त्याला म्रुनाेच्या (३ शतके) विक्रमाशी बराेबरी साधता अाली. याशिवाय राेहितने टी-२० मध्ये दाेन हजार धावा पूर्ण केल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...