आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार राेहित शर्माने पाहिला नाही शेवटचा चेंडू; सामना सुपर अाेव्हरच्या विचारात पॅड घालण्याची होती तयारी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे- टीम इंडियाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला पराभूत करून रविवारी टी-२० ची तिरंगी मालिका जिंकली. दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठाेकून टीम इंडियाचा राेमहर्षक विजय साजरा केला. हा शेवटच्या चेंडूवरचा थरार संघातील प्रत्येक खेळाडूने श्वास राेखून पाहिला. मात्र, याला टीम इंडियाचा कर्णधार राेहित शर्मा अपवाद ठरला. यादरम्यान ताे थेट उठून ड्रेसिंग रूममध्ये गेला हाेता. कार्तिक शेवटच्या चेंडूवर षटकार मारेल याची त्याला अाशाही नव्हती. दरम्यान, कार्तिक हा चाैकार मारेल अाणि अाता हा राेमांचक सामना सुपर अाेव्हरमध्ये जाईल, असेच त्याला वाटले हाेते. ही शक्यता लक्षात घेऊन ताे ड्रेसिंग रूममध्ये पॅड घालण्याच्या तयारीत हाेता. मात्र, याच वेळी कार्तिकने षटकार ठाेकून शानदार विजय मिळवून दिला. या जल्लाेषानंतर राेहित बाहेर अाला. त्यानंतर टीमने  जल्लाेषात विजय साजरा केला.

 

भारताने जिंकली सलग चाैथी टी-२० मालिका  

भारतीय संघाने सलग चाैथी टी-२० मालिका जिंकली. या तिरंगी मालिकेपूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंड, श्रीलंका व दक्षिण अाफ्रिका संघाविरुद्धची सिरीज पटकावली अाहे.

 

भारताने अाफ्रिकेला टाकले मागे
फायनल जिंकून भारताने अांतरराष्ट्रीय टी-२०  च्या सर्वाधिक सामन्यातील विजयाची नाेंद केली. यासह भारताने यामध्ये दक्षिण अाफ्रिकेला मागे टाकले. अाता भारताच्या नावे ९९ सामन्यांत ६१ विजयांची नाेंद झाली अाहे. अाफ्रिकेच्या नावे १०३ सामन्यांत ६० विजय अाहेत. यामध्ये पाक १२३ सामन्यांत ७४ विजयांसह अव्वल स्थानी अाहे.