स्पोर्ट्स डेस्क- बांगलादेशी क्रिकेटर आणि जगातील बेस्ट ऑलराउंडर्स पैकी एक शाकिब अल हसन आणि त्याची पत्नी उम्मी अहमद शिशिर शुक्रवारी एका मोठ्या दुर्घटनेतून बाल-बाल बचावले. हे दोघे ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करीत होते. मात्र ते उतरताच काही वेळातच क्रॅश झाले. कसा झाला अपघात...
- शाकिब आणि त्याची पत्नी एका अॅड शूटसाठी हेलिकॉप्टरने बांगलादेशाची राजधानी ढाकातून कॉक्सेस बाजार गेले. जे तेथून 27 किमी दूर आहे.
- हे कपल येथील रॉयल ट्यूलिप समुद्री रिजॉर्टमध्ये उतरले आणि अॅड शूटसाठी रवाना झाले.
- या दोघांना सोडून जेव्हा हेलिकॉप्टरने उड्डाण केले त्यानंतर 1.5 किलोमीटर दूर जाताच क्रॅश झाले.
- या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर चार लोक जखमी झाले. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही.
- जेव्हा शाकिबला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्याला धक्का बसला.
- या अपघातानंतर जेव्हा शाकिबला विचारले तेव्हा, याबाबत मला काहीच माहिती नव्हती कारण मी शुटिंगमध्ये बिजी होतो.'
- शाकिब आणि त्याची पत्नी उम्मी अहमदची गिनती बांगलादेशी क्रिकेटर्सपैकी सर्वात ग्लॅमरस कपल्सपैकी होती.
दोघांनी केले लव्ह मॅरेज-
- शाकिबने उम्मीसोबत लव्ह मॅरेज केले आहे. उम्मी बांगलादेशी-अमेरिकन आहे. ती जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हा तिचे आई-वडिल अमेरिकेत शिफ्ट झाले होते.
- अमेरिकेत मिनेसोटा यूनिवर्सिटीतून इंजीनियरिंग केलेली उम्मी 4 भाऊ व दोन बहिणीत सर्वात मोठी आहे.
- या दोघांची लव्ह स्टोरी इंग्लंडमध्ये सुरु झाली होती. तेथेच शाकिब-उम्मीची पहिली भेट झाली होती.
- शाकिब काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्याच दरम्यान उम्मी तेथे हॉलिडेवर आली होती.
- दोघेही एकाच हॉटेलात थांबले होते. याचदरम्यान त्यांची भेट झाली व तेथूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.
- शाकिब अल हसन आणि उम्मी अहमदचे लग्न 12 डिसेंबर 2012 रोजी झाले.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, शाकिब आणि उम्मी प्रमाणेच आशियातील सर्वात सुंदर क्रिकेट कपल्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)