आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडविरुद्ध कांगारूंनी केली दमदार सुरुवात, पहिल्या दिवसअखेर अाॅस्ट्रेलिया ३ बाद २८७

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडविरुद्ध प्रतिष्ठेची अॅशेस मालिका गमावणाऱ्या अाॅस्ट्रेलियाने गुरुवारी पाचव्या अाणि शेवटच्या कसाेटीत दमदार सुरुवात केली. पाहुण्या अाॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ३ बाद २८७ धावांची खेळी केली. अाता दुसऱ्या दिवशीही अापला दबदबा कायम ठेवण्याचा अाॅस्ट्रेलियन फलंदाजांचा प्रयत्न असेल.
डेव्हिड वाॅर्नर (८५), स्मिथ (नाबाद ७८) अाणि वाेग्स (नाबाद ४७) यांनी केलेल्या शानदार खेळीच्या बळावर अाॅस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करता अाली. अाता स्मिथ अाणि वाेग्स खेळत अाहेत.
यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून अापल्या घरच्या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार कुकचा हा निर्णय अाॅस्ट्रेलियन सलामीच्या जाेडीने साफ चुकीचा ठरवला. कारण राॅजर्स अाणि डेव्हिड वाॅर्नरने शानदार खेळी करून संघाला ११० धावांची दमदार सलामी दिली. यजमान टीमला या जाेडीला राेखण्यासाठी तब्बल ३३.२ षटकांपर्यंंत झुंज द्यावी लागली. अखेर वुडने सलामीवीर राॅजर्सला बाद करून इंग्लंडला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्यानंतर अलीने वाॅर्नरला झेलबाद केले.
डेव्हिड वाॅर्नरचे अर्धशतक
अाॅस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने १३१ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकारांच्या अाधारे संघाकडून सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने सलामीवीर राॅजर्ससाेबत पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करून टीमच्या धावसंख्येला गती दिली. त्यानंतर त्याने स्मिथसाेबत ५१ धावांची भागीदारी केली.