आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छातीवर बॉल लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फिंचच्या तोंडातून रक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहम - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंचला काउंटी क्रिकेटखेळताना छातीवर बॉल लागला असून त्याच्या तोंडातून रक्त आले होते. वॉरसेस्टशायर आणि यॉर्कशायर यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात फिंच 19 रन्सवर खेळत होता. बॉल लागल्यानंतर फिंच स्वतः चालत मैदानाबाहेर गेला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा ओपनर फिलिप ह्यूजला मैदानात बॉल लागल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
कसा लागला बॉल
बर्मिंगहम जवळील बर्टं ग्रीन वॉरसेस्टरशायर विरोधात यॉर्कशायरकडून फलंदाजी करत असताना फिंचला वेगवान गोलंदाज रसेलचा बॉल लागला. तो पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र बॉल छातीवर येऊन आदळला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याचे अनेक स्कॅन करण्यात आले आणि नंतर सुटी देण्यात आली.
पुढील सामने खेळणार नाही
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर 28 वर्षीय फिंचचे हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिन काढलेले नाही. मात्र, तो ज्या संघाकडून खेळत होता त्या यॉर्कशायरने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की फिंच बाबत हॉस्पिटलकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण काउंटी सामन्यातील पुढील सामने तो खेळणार नाही.

पुढील स्लाइडमध्ये, कसा झाला फिलिप ह्यूजचा मृत्यू
बातम्या आणखी आहेत...