आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाशिया चषक टी-20 : भारतीय महिलांची विजयी सलामी; बांगलादेशवर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने अाशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. भारताच्या महिला संघाने शनिवारी सलामी सामन्यात बांगलादेशवर मात केली. भारताने ६४ धावांनी सलामीचा सामना जिंकला. नाबाद ४९ धावा काढणारी मिताली राज सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. अाता भारताचा
स्पर्धेतील दुसरा सामना रविवारी यजमान थायलंडशी हाेईल.

पूनम यादव (३/१३), झुलन गाेस्वामी (२/१०) अाणि अनुजा पाटील (२/७) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारताने १८.२ षटकांत विजय संपादन केला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात ११८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश महिला संघाने अवघ्या ५४ धावांमध्ये गाशा गुंडाळला.
बातम्या आणखी आहेत...