आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित-रितिकासाठी नीता अंबानींनी दिली ग्रॅन्ड पार्टी, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितिका आणि रोहितच्या पार्टीला गीतासह पोहोचला भज्जी. - Divya Marathi
रितिका आणि रोहितच्या पार्टीला गीतासह पोहोचला भज्जी.
मुंबई- क्रिकेटर तसेच मुंबई इंडियंसचा कर्णधार रोहित शर्मा उद्या 13 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या निमित्ताने मुकेश अंबानी यांनी आपल्या घरी रोहित आणि रितिकासाठी ग्रॅन्ड पार्टीचे आयोजन केले होते. शुक्रवारी रात्री झालेल्या या पार्टीला शाहरुख खान, आदित्य रॉय कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रटींनी हजेरी लावली होती.
कुणी-कुणी लावली हजेरी?
सुरेश रैना, आलिया भट्ट, जॉन अब्राहम, शिखर, आदित्य रॉय कपूर, राधिकासह रहाणे, राजकुमार हिरानी, परिणीती चोपडा, अनिल कुंबळे, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, ऐश्वर्या, अभिषेक, आमिरची पत्नी किरण राव, भज्जी आणि गीता बसरा आदी या पार्टीत सहभागी झाले होते.
लग्नानंतर संगीत सेरेमनी
साधारणपणे संगीत सेरेमनीचा कार्यक्रम लग्नाआधी होत असतो. मात्र रोहितच्या लग्नात हा कार्यक्रम लग्नानंतर म्हणजेच 14 डिसेंबरला होणार आहे. यासाठी रितिकादेखील जोरदार सराव करत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन रितिकाचा भाऊ कुणाल याने केले आहे. त्याने या कार्यक्रमाची स्वतंत्र पत्रिकाही तयार केली आहे. संगीत सेरेमनीचा हा कार्यक्रम 'द सेंट रेगिस' हॉटेलमध्ये होणार आहे.
रितिका करत आहे डान्सचा सराव
रितिका आणि रोहित यांची लग्नाची जोरजार तयारी सुरू आहे. मात्र रितिकाचा अधिक भर आहे तो डान्सवर. ती डान्सची जोरदार तयारी करत आहे. रितिकाने डान्सच्या सरावाचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर रोहितने राघवेंद्रबरोबर एक फोटो शेअर केला आहे.
हे नेते होणार सहभागी
सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या लग्नासाठी काही विशेष VVIP पाहूणे उपस्थित राहणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अंबानी कुटुंब आणि सचिन तेंडुलकरसह काही विशेष मान्यवर आहेत. नुकतीच पार पडलेली दिल्ली टेस्ट सुरू असतानाच रोहित पत्रिका देण्यासाठी संसद भवनात गेला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS.... कुणी- कुणी लावली या ग्रॅन्ड पार्टीला हजेरी...
-अभिषेक आणि एश्वर्यानेही पोहोचले...
- अक्षय आला ट्विंकलसह...
- पाहा श्रीदेवीची मनमोहक अदा...