आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Disha Patani In The Role Of MS Dhoni\'s Former Girlfriend In Biopic

INTERESTING: धोनीच्या बायोपिकमध्ये ‘एक्स-गर्लफ्रेंड’, ही अॅक्ट्रेस साकारणार भूमिका!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशा पटानी आणि एमएस धोनी (फाइल फोटो). - Divya Marathi
दिशा पटानी आणि एमएस धोनी (फाइल फोटो).
एमएस धोनीवर तयार होत असलेल्या सिनेमात त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडचाही उल्लेख असणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार निर्मात्याने अॅक्ट्रेस दिशा पटानीला हा रोलही ऑफर केला आहे. ती आता धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसू शकते. मात्र, निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती कोणत्याही भूमिकेत नाही. फिल्म ‘धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये अॅक्टर सुशांतसिंह राजपूत मुख्य भूमिकेत असेल. तर साक्षीच्या भूमिकेत कियारा आडवाणी दिसणार आेहे.
कोण-कोणत्या अॅक्ट्रेससोबत जोडले गेले आहे धोनीचे नाव...
- 2010 मध्ये साक्षीसोबत लग्न करण्याआधी धोनीचे नाव बॉलीवुड अॅक्ट्रेस दीपिका पदुकोणसोबत जोडले गेले आहे.
- 2009 मध्ये दिपिका शिवाय धोनी आणि दाक्षिणात्य अॅक्ट्रेस राय लक्ष्मी यांचे अफेअर असल्याचेही बोलले जात होते.
- 2014 मध्ये धोनीसोबतचे नाते मान्य करत. तो क्षण आपल्यासाठी कलंक असल्याचेही लक्ष्मीने म्हटले होते.
का झाली दिशाची सिनेमात ऐंट्री
- सांगण्यात येते की, या सिनेमासाठी एखाद्या नव्या आणि फ्रेश चेहऱ्याची गरज होती. या साठी दिशा पूर्णपणे फिट आहे.
- या सिनेमात दिशाची भूमिका फार प्रेरणादायी आहे. सुशांत आणि तिची जोडीही सुंदर दिसते.
- याआधी दिशा अॅक्टर टायगर श्रॉफसोबत असलेल्या अफेयरमुळे चर्चेत आली होती.

दिशा पटानीचे करिअर
- 2013 मध्ये फेमिना मिस इंडियाची फर्स्ट रनर-अपच्या रुपात चर्चेत आली.
- शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात करिअरला सुरुवात.
- डेरी मिल्क चॉक्लेटच्या अॅडमुळे प्रसिद्ध.
- 2015 मध्ये लोफर या तेलुगु सिनेमात काम केले आहे.

धोनीचा बायोपिक 2 सप्टेंबर, 2016 मध्ये प्रदर्षित होत असल्याची माहिती खुद्द सुशांतनेच ट्वीटच्या माध्यमातून दिली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅक्ट्रेस दिशा पटानीचे इंस्टाग्रामवरील काही ग्लॅमरस PHOTOS...