आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भज्‍जीच्‍ाी गर्लफ्रेंड खूश, जाणून घ्‍या काय म्‍हणाली गीता बसरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन सिंह आणि गीता बसरा. - Divya Marathi
हरभजन सिंह आणि गीता बसरा.
फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याची टीम इंडियामध्‍ये वापसी झाल्‍याने त्‍याची गर्लफ्रेंड अभिनेत्री गीता बसरा सध्‍या चांगलीच खूश आहे. नुकत्‍याच एका मुलाखतीत तीने हरभजनचे तोंडभरून कौतूक केले. मात्र आपल्‍या संबंधाबाबत तिचे चुप्पी धारण केली होती. गीता बसरा लवकरच 'सेकंड हॅन्‍ड हसबंड' या सिनेमात दिसणार आहे.
अभिनेत्री गीता बसरा एका मुलाखतीत म्‍हणाली, 'आपल्‍या कामामध्‍ये प्रामाणिक मेहनत कशी घ्‍यावी हे मला हरभजनकडून शिकण्‍यास आवडले.' हरभजनप्रमाणे आपल्‍याला कामातही आवड निर्माण करायची आहे, असे तिने बोलून दाखवले.
हरभजन विनम्र आहे
'हरभजन खूप विनम्र आहे. शिवाय त्‍याने अतिशय कमी वयात क्रिकेटमध्‍ये नाव कमावले आहे'. असेही गीता म्‍हणाली. भज्‍जी मजबूत आहे. प्रत्‍येक सामन्‍यात त्‍याचे कतृत्‍व झळकते. असे कौतूकही तिने केले आहे.
वेळ आल्‍यावर लग्‍नाचे सांगेन
लग्‍नाविषयी बोलताना गीता म्‍हणाली, 'आमच्‍या लग्‍नाचा विषय मिडीयामध्‍ये वारंवार चर्चिला गेला. प्रत्‍येक मुलीसाठी लग्‍न ही महत्‍त्‍वाची बाब असते. वेळ येईल तेव्‍हा लग्‍नाविषयीही मी सांगणार आहे.'
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, हरभजन व गीताचे फोटो..