आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणने टी-२० सामन्यात विक्रमासह आयर्लंडला हरवले, मोहम्मद नबीची ८९ धावांची तुफानी खेळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेटर नोएडा- ग्रेटर नोएडात झालेल्या मोठ्या स्कोअरच्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडला २८ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली.
अफगाणिस्तानने रविवारी ८ बाद २३३ धावांचा मोठा स्कोअर २० षटकांत उभा केला. प्रत्युत्तरात आयर्लंडला २०५ धावाच काढता आल्या. अफगाणने आयर्लंडचे ३-० ने व्हाइटवॉश केले. तीन सामन्यांत ९ विकेट घेणारा गोलंदाज रशिद खान मालिकावीर ठरला. मोहम्मद  नबीने तिस ऱ्या  सामन्यात अवघ्या ३० चेंडूंत ८९ धावांची तुफानी खेळी केली. मो. नबी या खेळीमुळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणचा हा सलग अकरावा विजय ठरला आहे.  

आयर्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा िनर्णय घेतला. मागच्या सामन्यातील हीरो नजीब तरकाई यावेळी केवळ ३ धावा काढून बाद झाला. यानंतर दुसरा सलामीवीर मोहम्मद शहजादने शानदार खेळी करून अर्धशतक ठोकले. त्याने ४३ चेंडूंत ५ षटकार, ६ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे अफगाणने ११ व्या षटकातच १०० धावांचा टप्पा गाठला. अफगाणची टीम एकवेळ २ बाद ११९ धावा अशा स्थितीत होती. नंतर ५ बाद १२१ धावा अशा अडचणीत अफगाण टीम सापडली. आयर्लंडने सामन्यात पुनरागमन केले आहे, असे वाटत होते. मात्र, मो. नबी नावाचे तुफान नंतर मैदानात अवतरले. नबीने अवघ्या ३० चेंडूंत ९ गगनभेदी षटकार आणि ६ चौकारांच्या साह्याने ८९ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीने अफगाणिस्तानने ८ बाद २३३ धावांचा विक्रमी स्कोअर उभा केला. आयर्लंडकडून केविन ओब्रायनने ४ तर जॅकब म्युलडरने २ गडी बाद केले.  

धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने वेगवान सुरुवात केली. पॉल स्टर्लिंगने २० चेंडूंत ४९ धावा आणि स्टुअर्ट थाॅम्पसने १८ चेंडूंत ४३ धावांची तुफानी खेळी केली. सातव्या षटकात आयर्लंडचा स्कोअर १ बाद ९५ धावा असा होता. यानंतर अफगाणाने पुनरागमन केले. गॅरी विल्सनने ३४ चेंडूंत ५९ धावा काढून आयर्लंडला २०० धावांचा टप्पा गाठून िदला. मात्र, १९ व्या षटकात रशिद खानने ३ गडी बाद करून आयर्लंडचा डाव २०५ धावांत गुंडाळला. आयर्लंडचा डाव ५ बाद २०१ वरुन सर्वबाद २०५ धावांत आटोपला. रशिद खानने ३ गडी बाद केले. दोन्ही संघात आता पाच सामन्यांची वनडे मालिका १५ मार्चपासून होईल. 

रशिद खानचे यश
रशिद खानने मालिकेत ९ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात त्याने २ षटकांत ३ धावांत ५ गडी बाद केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे टी-२० गोलंदाजीतील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. याच रशिद खानला आयपीएल-१० साठी हैदराबादने ४ कोटी रुपयांत खरेदी केले आहे. रशिद खान लेगब्रेग गोलंदाज असून, तो उपयुक्त फलंदाजही आहे. रविवारच्या लढतीत  त्याने ३ गडी बाद केले.
बातम्या आणखी आहेत...