आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया मजबूत, द. आफ्रिका 6 बाद 194

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या (१४५) शतकानंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. द. आफ्रिकेने आपला डाव ९ बाद २५९ धावांवर घोषित केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८३ धावा काढून १२४ धावांची आघाडी घेतली होती.
दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन करताना द. आफ्रिकेला ६ बाद १९४ धावा असे अडचणीत आणले होते. तोपर्यंत आफ्रिकेकडे ७० धावांची अाघाडी हाेती. मालिकेत २-० ने मागे असलेल्या ऑस्ट्रेलियाला अाता विजयाची संधी निर्माण झाली. चौथ्या दिवशी आफ्रिकेला झटपट गुंडाळून छोटे लक्ष्य गाठण्याचा कांगारूंचा प्रयत्न असेल. तिसऱ्या
दिवशी ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३०७ धावांवरून सुरुवात केली. त्यावेळी ख्वाजा १३८, तर स्टार्क १६ धावांवर नाबाद होते. ख्वाजा १४५ धावा काढून बाद झाला. स्टार्कने (५३) अर्धशतक ठोकले. अॅबोट व रबाडाने प्रत्येकी ३, तर फिलेंडरने २ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू लॉयनने ४८ धावांत ३ गडी बाद केले. लॉयनने डुमिनी, बुवामा व अॅबोटला बाद केले. स्टार्कने २, हेझलवूडने एकाला टिपले.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका पहिला डाव २५९. ऑस्ट्रेलिया पहिला डाव (ख्वाजा १४५, स्मिथ ५९, हँड्सकोम्ब ५४, स्टार्क ५३). द. आफ्रिका
दुसरा डाव : ६ बाद १९४ धावा. (कुक नाबाद ८१.)
बातम्या आणखी आहेत...