आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमांचक लढतीत आफ्रिकेची कांगारूंवर ४७ धावांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुयाना - तिरंगी मालिकेतील रोमांचक लढतीत दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियावर ४७ धावांनी शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अाफ्रिकेने अवघ्या १८९ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया सहज लक्ष्य गाठेल असे वाटत असताना द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ३४.२ षटकांत केवळ १४२ धावांवर रोखत बाजी मारली.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर अॅरोन फिंचने १०३ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकार खेचत सर्वाधिक ७२ धावा केल्या. दहाव्या क्रमांकावर आलेल्या नॅथन लॉयनने ३० धावा करून संघर्ष केला. इतर आघाडीच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने १३ धावा देत ३ फलंदाज तंबूत पाठवले. पारनेल, इम्रान ताहिर आणि फॅगिसोने प्रत्येकी २ गडी बाद केले. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमलाने ३५, तर डिकॉकने १८ धावा जोडल्या. एबी डिव्हिलर्सने २२ आणि जेपी डुमिनीने १३ धावा काढल्या. सहाव्या क्रमांकावर आलेल्या बेहर्दीनने अर्धशतक ठाेकले. त्याने ८२ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६२ धावा काढल्या. रबाडा १५ धावांवर नाबाद राहिला.
गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून जोश हॅझलवूड, कुल्टर नाइल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका ५० षटकांत ९ बाद १८९ धावा. हाशिम आमला ३५, बेहर्दीन ६२ धावा. हॅझलवूड २/२०. ऑस्ट्रेलिया ३४.२ षटकांत १४२ धावा. अॅरोन फिंच ७२, रबाडा ३/१३.
बातम्या आणखी आहेत...