आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदी, अकमलच्या हकालपट्टीची शक्यता, प्रसारमाध्यमांशी बोलणे आफ्रिदीच्या अंगलट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारतामध्ये टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी आलेला पाकिस्तान संघ विविध कारणांमुळे सध्या चर्चेत येत आहे. यामध्येच आता प्रसारमाध्यमांशी बोलणे सध्या शाहिद आफ्रिदीच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. यातूनच त्याच्यावर कर्णधारपदावरून हकालपट्टीचे सावट निर्माण झाले.
आफ्रिदीशिवाय टीममधील उमर अकमलवर संघ व्यवस्थापक चांगलेच नाराज आहेत. आपल्या फलंदाजीच्या क्रमात बदल करण्यासाठी इमरान खानकडे शिफारस केल्याचेही आता समोर आले आहे. याशिवाय आता हारुण रशीदची निवड समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात येणार आहे.
हकालपट्टीवर शिक्कामोर्तब
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आफ्रिदीची राष्ट्रीय टीमच्या कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे, असे सध्या वृत्त आहे. आता त्याच्या जागी नेतृत्वाची धुरा इतरावर सोपवण्यात येणार आहे.

उमरला बाहेर करा : रमीज राजा
स्वार्थी भावनेतून अकमलने ही शिफारस केल्याचा ठपका व्यवस्थापकांनी केला. त्याचे हे वर्तन चुकीचे आहे. त्यामुळे मी नाराज आहे, असे रमीज राजा म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...