आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND-ENG:इंग्लंडविरूद्ध 23 वर्षानंतर सलग दोन विजय, कोहली ठरला 5 वा कर्णधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने इंग्लंडविरोधात 23 वर्षानंतर सलग दोन कसोटी विजय मिळवला आहे, तर असा पराक्रम करणारा विराट कोहली पाचवा कर्णधार ठरला आहे. - Divya Marathi
भारताने इंग्लंडविरोधात 23 वर्षानंतर सलग दोन कसोटी विजय मिळवला आहे, तर असा पराक्रम करणारा विराट कोहली पाचवा कर्णधार ठरला आहे.
मोहाली- मोहाली येथे सुरु असलेली तिसरी कसोटी भारताने चौथ्या दिवशीच 8 गडी राखून जिंकली आहे. 103 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 20.2 षटकातच 2 बाद 104 धावा केल्या. सलामीवीर पार्थिव पटेल 67 तर विराट कोहली 6 धावांवर नाबाद राहिले. पार्थिव पटेलने 54 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 67 धावा ठोकल्या. त्याआधी चेतेश्वर पुजाराने 25 धावांचे योगदान दिले, तर सलामीवीर मुरली विजय शून्यावर बाद झाला. आज दुपारी भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 236 धावांत गुंडाळला होता. भारताला पहिल्या डावात 134 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली होती. त्यामुळे 103 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने चौथ्या दिवशीच मोहाली कसोटी सहज खिशात घातली. या कसोटीत 90 धावा आणि 4 विकेट घेणा-या रविंद्र जडेजाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला. पाच कसोटीच्या मालिकेत भारत 2-0 असा आघाडीवर आहे. भारताने इंग्लंडविरोधात 23 वर्षानंतर सलग दोन कसोटी विजय मिळवला आहे, तर असा पराक्रम करणारा विराट कोहली पाचवा कर्णधार ठरला आहे. इंग्लंडविरूद्ध 2 किंवा त्यापेक्षा अधिक विजय....
- 1961 मध्ये नारी कॉन्टॅक्टर कर्णधार होते तेव्हा भारताने इंग्लंडला 2-0 असे हरविले होते.
- 1972 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने इंग्लंडला 2-1 असे हरविले होते.
- 1986 मध्ये कपिल देवने इंग्लंडविरूद्ध भारताला 2-0 असा विजय मिळवून दिला होता.
- 1993 मध्ये मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्त्वाखाली भारताने इंग्लंडला 3-0 असे पराभूत केले होते.
इंग्लंडविरूद्ध घरच्या मालिकेत भारताचे असे आहे विजयाचे रिकॉर्ड-
- 1933 ते 2016 पर्यंत भारत-इंग्लंड यांच्यात 58 कसोटी सामने झाले आहेत.
- 16 मॅचमध्ये भारताने विजय मिळवला आहे तर 13 कसोटीत पराभव झाला आहे. 28 कसोटी ड्रॉ राहिल्या.
- या दरम्यान भारताची सर्वाधिक धावसंख्या 509 राहिली तर सर्वात कमी धावसंख्या 83 राहिली.
इंग्लंडला 236 धावांत गुंडाळले-
- इंग्लंडने आज सकाळी चौथ्या दिवशी 4 बाद 78 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली.
- मात्र, आज सकाळी भारताने इंग्लंडला दुस-याच षटकात पाचवा धक्का दिला. रविंद्र जडेजाने नाईटवॉचमन म्हणून आलेल्या गॅरेथ बेट्टीला शून्यावर पायचित केले.
- त्यानंतर जोस बटलर 18 धावांवर बाद झाला. त्याला जयंत यादवने जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले.
- त्यानंतर कालपासून मैदानात तळ ठोकून बसलेल्या जो रूटला जडेजाने 78 धावांवर रहाणेकडे झेलबाद केले.
- त्यानंतर ख्रिस वोक्स (30) आणि अब्दुल रशीद (0) यांना मोहम्मद शमीने लागोपाठच्या चेंडूवर बाद केले.
- त्यानंतर हसीब हमीद आणि जेम्स अंडरसन जोडी मैदानात होती. मात्र, हमीदने फटकेबाजी करत वेगाने धावा करण्यास सुरुवात केली.
- त्यात त्याला यश आले. त्याने नाबाद 59 धावा काढल्या. अखेर जेम्स अंडरसन 5 धावांवर धावबाद झाला.
- भारताकडून आर अश्विनने तीन बळी टिपले. तर, जडेजा, मोहम्मद शमी आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
फिरकीपटू अश्विन, जडेजा, जयंत यादव यांची मोहालीत अष्टपैलू कामगिरी-
- भारताच्या फिरकीपटू त्रिकुटाने मोहालीत अष्टपैलू कामगिरी करत उच्च दर्जाचा खेळ केला.
- पहिल्या डावात अश्विनने (72), रविंद्र जडेजाने (90) तर जयंत यादवने (55) जबरदस्त फलंदाजी केली.
- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 7 व्या, 8 व्या आणि 9 व्या क्रमांकावर येऊन अर्धशतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ होती.
- यानंतर या त्रिकुटाने आपल्या फिरकीवर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले.
- अश्विनने पहिल्या डावात 1 गडी तर दुस-या डावात 3 बळी टिपले.
- रविंद्र जडेजानेही पहिल्या आणि दुस-या डावात प्रत्येकी दोन दोन बळी घेत 4 विकेट काढल्या.
- जयंत यादव यानेही आपली उपयुक्तता दाखवून देताना 4 बळी टिपले.
- या त्रिकुटाने मोहालीत इंग्लंडचे 20 पैकी 12 बळी घेतले. तसेच फलंदाजीत योगदान देताना 217 धावा केल्या.
संक्षित धावफलक-
इंग्लंड- 283 आणि 236
भारत- 417 आणि 2 बाद 104
भारत मालिकेत 2- 0 आघाडीवर
- मोहालीतील विजयाबरोबरच भारताने 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
- भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित अवस्थेत राहिली होती.
- विशाखापट्टणम येथे झालेली दुसरी कसोटी भारताने तब्बल 246 धावांनी जिंकली होती.
- चौथी कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 8 ते 12 डिसेंबर दरम्यान होईल.
- तर पाचवी कसोटी चेन्नई येथे 16 ते 20 डिसेंबर दरम्यान होईल.
बातम्या आणखी आहेत...