आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये २ वर्षांनी होऊ शकतात १० संघ ? १९ जुलै रोजी मुंबईत बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्पॉट फिक्सिंग लचांडामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्जवर दोन वर्षांची बंदी आणण्यात आली. त्यामुळे आता ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीसीसीआय अनेक पर्यायांवर विचार करत आहे. बंदी घातलेल्या दोन संघांच्या जागी दोन नवे संघ घेऊन संघांची संख्या आठच ठेवली जाऊ शकते. चेन्नई आणि राजस्थानवरील बंदी उठल्यास संघांची संख्या १० होईल. म्हणजेच २०१७ पासून आयपीएलमध्ये १० संघ खेळतील.

आयपीएल संचालन परिषदेने १९ जुलैला मुंबईतील आपत्कालीन बैठक बोलावली आहे. रविवारी बैठकीत निर्णय झाल्यास निविदा जारी करून बोली प्रक्रिया सुरू करण्याबाबत तसेच नव्या संंघांसाठी कोणती नवी शहरे उत्सुक आहेत याची चाचपणी केली जाईल. त्यामुळे आयपीएलमध्ये ८ संघ कायम राहू शकतील. २०१७ नंतर आयपीएल ९ वा १० संघांचीही होऊ शकते. कारण हे दोन संघ २०१८ मध्ये परतूही शकतात. २०१८ च्या स्पर्धेपूर्वी नव्याने लिलाव होईल. त्या वेळची परिस्थिती काहीशी निराळी असेल.

ताजी निविदा जारी करणे सोपे नाही
ताजी निविदा काढणे बीसीसीआयसाठी निश्चितच सोपे नसेल. सर्वप्रथम चेन्नई आणि जयपूरला फ्रेंचायझी स्तरावरून दूर करावे लागेल. दोन नव्या संघांना दोन वर्षे हाती असतील हेही बीसीसीआयसमोर धर्मसंकट आहे.

पुराव्याविना दोषी ठरवले : कुंद्रा
^
मी निर्दोष आहे. एकही पुरावा नसताना मला दोषी ठरवण्यात आले. माझ्याविरुद्ध जे पुरावे आहेत ते किमान मला तरी दाखवा अशी जस्टिस लोढा समितीला विनंती आहे. कोणत्या आधारावर त्यांनी माझी प्रतिष्ठा मातीमोल केली ते मला जाणून घ्यायचे आहे.
राज कुंद्रा, राजस्थानचे मालक

सुंदररमनांचा राजीनामा नाही
मुंबई। आयपीएल भ्रष्टाचार चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आयपीएलचे मुख्य संचालन अधिकारी सुंदररमन अहवाल येईपर्यंत राजीनामा देणार नाहीत. मंगळवारी दिवसभर बीसीसीआय मुख्यालयातील आपल्या कार्यालयात ते बसून होते. भ्रष्टाचारप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...