आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे मालिका: अजिंक्य रहाणेचे शानदार शतक; काेहली, शिखर धवनही चमकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिनिदाद- टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेने रविवारी यजमान विंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये शानदार शतक ठाेकले. त्याने झंझावाती १०३ धावांची खेळी केली.   याशिवाय शिखर धवन (६३), कर्णधार विराट काेहली (८७) यांनी तुफानी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांपर्यंत पाच गड्यांच्या माेबदल्यात ३१० धावा काढल्या. सलामीचा सामना पाण्यात गेला. टीम इंडियाचा स्फाेटक फलंदाज युवराज सिंग (१४) फारसी छाप पाडू शकला नाही. 
 
यजमान विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार जेसन हाेल्डरचा हा निर्णय टीम इंडियाच्या सलामीवीर अजिंक्य रहाणे अाणि शिखर धवनने साफ चुकीचा ठरवला. त्यांनी धडाकेबाज फलंदाजी करताना यजमानांच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे टीम इंडियाच्या धावसंख्येचा अालेख उंचावत राहिला.

रहाणेचे तिसरे शतक 
भारताकडून सलामीवीर अजिंक्य रहाणेने तुफानी फटकेबाजी केली. त्याने अापल्या करिअरमधील तिसरे शतक ठाेकले. त्याने १०४ चेंडूंचा सामना करताना दहा चाैकारांसह दाेन उत्तंुग षटकार ठाेकून १०३ धावांची खेळी केली.  काेहलीने सलामीची संधी दिल्याने रहाणेचा अात्मविश्वास द्विगुणित झाला. त्यामुळे त्याला तुफानी फटकेबाजी करता अाली.

रहाणे-धवनची शतकी भागीदारी 
भारताकडून सलामीवीर रहाणे अाणि शिखर धवन ही जाेडी पुन्हा चमकली. त्यांनी शानदार फलंदाजी करताना टीम इंडियाला शतकी भागीदारीची सलामी दिली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ११४ धावांची भागीदारी रचली. 

धवन, काेहलीचे अर्धशतक 
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन अाणि कर्णधार विराट काेहलीने अर्धशतके ठाेकली. धवनने मालिकेमध्ये सलग दुसरे अर्धशतक ठाेकले. त्याने दुसऱ्या वनडेमध्ये ६३ धावांची खेळी केली. काेहलीने ६६ चेंडूंमध्ये प्रत्येकी चार चाैकार अाणि षटकार ठाेकून ८७ धावांची खेळी केली. 

पुन्हा पावसाचा व्यत्यय
दुसऱ्या वनडेदरम्यानही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामन्याला उशिरा सुरुवात करण्यात अाली.तसेच षटकांमध्येही कपात करण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्यामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळवण्यात अाला. 
बातम्या आणखी आहेत...