आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajinkya Rahane Made World Record By Taking Most Catches In A Test

अजिंक्‍य रहाणेचा विश्‍वविक्रम, टिपले लंकेच्‍या आठ गड्यांचे झेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूस-या डावात कुमार संगकाराची झेट टिपताना अजिंक्य रहाणे. - Divya Marathi
दूस-या डावात कुमार संगकाराची झेट टिपताना अजिंक्य रहाणे.
गॉल - येथे सुरू असलेल्‍या कसोटी मालिकेत भारताच्‍या अजिंक्‍य रहाणेने सर्वाधिक झेल घेऊन नवीन जागतिक विक्रम केला आहे. रहाणे फलंदाजीत कमी पडला असला तरी क्षेत्ररक्षणात त्‍यांने बाजी मारली आहे. या सामन्‍यात त्‍याने आठ गड्यांना झेलबाद करून सर्वाधिक झेल घेण्‍याचा विक्रम नावावर केला आहे. ऑस्‍ट्रेलियाच्‍या ग्रॅग चॅपलचा विक्रम त्‍याने तोडला आहे.

रहाणने यांना केले झेलबाद
रहाणेने या सामन्‍याच्‍या पहिल्‍या डावात करुणारत्ने, थिरिमाने, चांडीमल यांना झेलबाद केले. दुस-या डावात प्रसाद, संगकारा, थिरिमाने, मुबारक आणि हेराथ यांनाही त्‍याने झेलबाद करून तंबूत धाडले.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..