आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षरच्या पहिल्या हॅट्ट्रिकने पंजाब इलेव्हन ‘सिंग इज किंग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - पाच चेंडूत डावखुरा लेगस्पिनर अक्षर पटेलने घेतलेल्या मोसमातील पहिल्या हॅट्ट्रिकच्या आधारे गुणतालीकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने अव्वल स्थानी असलेल्या गुजरात लाॅयन्सला २३ धावांनी चित करून मोसमातील दुसऱ्या विजयाची नोंद केली.

आयपीएलच्या नवव्या मोसमातील या चुरशीच्या सामन्यात अक्षरच्या तडाख्यामुळे लाॅयन्सची १५५ धावांच्या लक्ष्याचा सामना करताना एकवेळ ६ बाद ५७ अशी दयणीय स्थिती झाली होती. यातून गुजरातला शेवटपर्यंत सावरता आले नाही. उभय संघांची फलंदाजी ऐनवेळी गडगडल्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विशेष बाब अशी की पंजाबचा कर्णधार मुरली विजय वगळता इतर फलंदाजांना अर्धशतकापर्यंत पोहोचता आले नाही. किंग्ज इलेव्हनने १९.५ षटकात सर्वबाद १५४ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात गुजरात लाॅयन्सला २० षटकात ९ बाद १३१ धावांवर रोखण्यात पंजाबने यश मिळवले.

पंजाबचे दिग्गज ब्रेंडन मॅकलम व सुरेश रैनाच्या यष्ट्यांचा वेध मोहित शर्माच्या दोन सरळ वेगवान चेंडूंनी घेतल्यामुळे गुजरातला असा काही जबर हादरा बसला की यातून ते सावरलेच नाही. दोन महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्याचा इतर फलंदाजांनी चांगलाच धसका घेतला. त्याचा लाभ अक्षर पटेलच्या पदरी पडला. त्याने स्मिथ, कार्तिक, ब्राव्हो आणि जडेजा या चार फलंदाजांना पाच चेंडूत परत धाडून हॅट्िट्रक पूर्ण केली. यानंतर इशान किशनने २७, फाल्कनरने ३२ आणि प्रवीण कुमारने १५ धावा करून संघाला यश िमळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर फार उशीर झाला होता.

तत्पूर्वी सध्या जबर फाॅर्मात असलेल्या मुरली विजयने सलामीला अष्टपैलू स्टोईनिससोबत ६५ धावांचे दणकट भागीदारी करून किंग्ज इलेव्हनला चांगली सुरुवात करून दिली. मात्र स्टाईनिस २७ धावांवर सातव्या षटकात तंबूत परतल्यानंतर मार्श, मॅक्सवेल, गुरकिरत हे तीन फलंदाज आले तसेच परतले. धावांचा वेग वाढवण्याच्या नादात विजय संघाच्या १०० धावा असताना ५५ धावा करून परत फिरला.

त्यामुळे हा संघ लवकर बाद होणार असे वाटले होते. परंतु, मधल्या फळीतील मिलरने ३१ आणि साहाने ३३ धावा ठोकून संघाला समाधानकारक धावसंख्या उभारू दिली. शेपटाकडील चार फलंदाज केवळ तीन धावांची भर घालू शकले.

अक्षर, मोहितच्या धारदार माऱ्याने पंजाब विजयी
अक्षर पटेल व मोहित शर्मा यांनी केलेल्या धारदार माऱ्यामुळेच किंग्ज इलेव्हन पंजाबला मोसमातील दुसऱ्या विजयाची चव चाखता आली. अक्षरने तर असा काही अफलातून मारा केला की गुणतालीकेत पहिल्या स्थानावर असलेल्या गुजरात लाॅयन्सच्या मातब्बर फलंदाजांना पळता भुई थोडी झाली. उर्वरित कसर मोहित शर्माने त्याच्या धारदार स्विंग गोलंदाजीमुळे भरू काढली. या दोघांनी एकूण ७ फलंदाजांना खेळपट्टीवर जमूही न देता आले तसेच परत धाडले. अक्षरने चार तर मोहितने तीन फलंदाजांना टीपले.

चमत्कार घडेल याची कल्पना नव्हती
मी माझ्या नेहमीच्याच शैलीत गोलंदाजी केली. मोसमातील हॅट्ट्रिक माझ्या नावावर होण्याचा चमत्कार घडेल याची कल्पना नव्हती. मी प्रत्येक चेंडू पूर्ण क्षमतेने टाकत होतो.-अक्षर पटेल, मॅन आॅफ द मॅच
बातम्या आणखी आहेत...