आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षरची क्रमवारीत प्रगती : अायसीसी वनडे क्रमवारी १३ व्या स्थानावर मारली धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारताचा युवा गाेलंदाज अक्षर पटेलने वनडेच्या क्रमवारीत माेठी प्रगती साधली. याशिवाय त्याने अापल्या करिअरमध्ये क्रमवारीतील सर्वाेत्कृष्ट स्थान गाठले आहे. त्याने अायसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत १३ वे स्थान पटकावले. नुकताच झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत अक्षर पटेलने धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. तसेच फलंदाजीच्या क्रमवारीत युवा स्टार खेळाडू विराट काेहली दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला अाहे. अव्वल दहा जणांत भारताच्या तीन फलंदाजांनी स्थान मिळवले. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सातव्या तर शिखर धवन दहाव्या क्रमांकावर आहेत. यामध्ये अाफ्रिकेच्या एबी डिव्हिलर्सने अव्वल अाणि हाशिम अामलाने तिसरे स्थान कायम ठेवले.

याशिवाय भारताचा गाेलंदाज जसप्रीत बुमराहनेही क्रमवारीत प्रगती केली. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत एकूण ९ विकेट घेतल्या. त्याचा त्याला क्रमवारीत माेठा फायदा झाला. त्याने ९७ वे स्थान गाठले. यापूर्वी ताे १२५ व्या स्थानावर हाेता. तसेच धवल कुलकर्णीने ८८ व्या स्थानी धडक मारली. त्याने मालिकेत ५ बळी घेतले. त्यामुळे त्याला क्रमवारीत सुधारणा करता अाली. गोलंदाजी क्रमवारीत वेस्ट इंडिजाच्या सुनिल नरेनने अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसऱ्या स्थानावर आहे .
बातम्या आणखी आहेत...