आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Karnewars Off Spin And Left Arm Spin In Same Match

विदर्भाच्‍या अक्षयची एका षटकात दोन्ही हातांनी गोलंदाजी, फलंदाजांची त्रेधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाव्या हाताने बॉलिंग करताना अक्षय(डावीकडून), उडव्या हाताने बॉलिंग करताना अक्षय (उजव्या बाजूला.) - Divya Marathi
डाव्या हाताने बॉलिंग करताना अक्षय(डावीकडून), उडव्या हाताने बॉलिंग करताना अक्षय (उजव्या बाजूला.)
नवी दिल्ली- तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचा कुलदीप यादव हा चांगलाच चर्चेत अाला हाेता, जेव्हा त्याने अायपीएलच्या एका सराव सामन्यात सचिन तेंडुलकरला अापल्या ‘चायनामॅन’ने त्रिफळाचीत केले हाेते. डाव्या हाताच्या कलाईच्या अाधारे अाॅफ स्पिन करणारे चायनामॅन गाेलंदाज फारच दुर्लभ असतात. अांतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण अाफ्रिकेचा पाॅल एडम्स अशा प्रकारचे चेंडू टाकत हाेता. अाता मुश्ताक अली ट्राॅफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत एका गाेलंदाजाने चक्क दाेन्ही हातांनी गाेलंदाजी करण्याचा पराक्रम गाजवून सर्वांचे लक्ष वेधले. विदर्भच्या २३ वर्षीय युवा स्पिनर अक्षय कर्नवारने बडाेद्याविरुद्ध एका षटकात सर्वच चेंडू हे हात बदलून बदलून टाकले. त्यामुळे फलंदाज अाश्चर्यचकित हाेऊन पाहतच राहिले. त्यांना त्यावर एकही फटका मारता अाला नाही.
विदर्भच्या अक्षय कर्नवारच्या या गाेलंदाजीने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले अाहे. अशा प्रकारे दाेन्ही हातांनी गाेलंदाजी करणारे (एंबिडेेक्सट्रॅस स्पिनर) फिरकीपटू फारच कमी पाहायला मिळतात. त्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर वरिष्ठ टीममध्ये स्थान मिळवले. यंदाच्या विजय हजारे ट्राॅफीमध्ये त्याने विदर्भ संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने सात सामन्यांत १६ विकेट घेतल्या.
षटकांत फलंदाजांची त्रेधा
अक्षयने पहिला चेंडू उजव्या हाताने टाकला, क्षेत्ररक्षकाने झेल साेडली. दुसरा चेंडू डाव्या हाताने टाकला. पुन्हा एकदा गाेलंदाजीच्या कृतीत बदल केला. चाैथा चेंडू डाव्या हाताने टाकला,हार्दिक पांड्याची झेल सुटली. त्यानंतर पुढील दाेन्ही चेंडू अक्षयने उजव्या अाणि डाव्या हाताने टाकले.
....जेव्हा साेबर्सला हनीफने परेशान केले हाेते
उजव्या हाताने स्पिन गाेलंदाजी करणाऱ्या हनीफ माेहमदने १९५८ मध्ये गॅरी साेबर्सला कसाेटीत ३६५ धावांच्या विक्रमी खेळीपासून वंचित ठेवण्यासाठी डाव्या हातानेही चेंडू टाकले हाेते. साेबर्सने त्याच्या षटकातील दुसऱ्या अाणि तिसऱ्या चेंडूवर चाैकार मारून लेन हटनच्या विश्व विक्रमाची (३६४) बराेबरी केली. हनीफने उजव्या हाताचा वापर केला. या षटकांतील दाेन चेंडू परफेक्ट लेंथवर हाेते. मात्र, शेवटच्या चेंडूवर साेबर्सने ३६५ धावांचा चमत्कारिक अाकडा पार केला. त्यामुळे हनीफचा प्रयत्न अपयशी ठरला.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो.... आणि पाहा त्याच्या बॉलिंगचा अफलातून व्हिडिओ...