आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूर आणि स्वादाचा उत्तम ‘शेफ’ आहे अॅलेस्टर कुक !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कुकने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत शतक ठोकले होते. हे त्याचे भारतात पाचवे शतक ठरले. भारतात सर्वाधिक शतके ठोकणारा तो विदेशी खेळाडू बनला आहे. आता दुसऱ्या कसोटीत त्याच्यावर इंग्लंडच्या विजयाची जबाबदारी असेल.
कसोटीत २०००, ३०००, ४०००, ५००० आणि ६००० धावा काढणारा इंग्लंडचा अॅलेस्टर कुक सर्वात युवा खेळाडू आहे. कसोटीत ७०००, ८०००, ९००० आणि १० हजार धावा पूर्ण करणारा तो जगातला सर्वात युवा खेळाडू आहे. भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि बांगलादेशविरुद्ध त्याने पहिल्या कसोटीत शतक ठोकले आहे. आपल्या पहिल्याच वर्षी १००० धावा पूर्ण करणारा तो इंग्लंडचा एकमेव खेळाडू आहे. असे अनेक विक्रम कुकच्या नावे आहेत. यामुळेच त्याला विक्रमांचा बादशहा म्हटले जाते.
५ डिसेंबर १९८४ रोजी ग्लुस्टरशायर येथे जन्मलेल्या कुकचे वडील इंजिनिअर होते. ते क्रिकेटही खेळत असत. मात्र, सहकारी खेळाडूंत कॅप्टन कुक नावाने प्रसिद्ध अॅलेस्टरला सुरुवातीपासून क्रिकेटपटूच व्हायचे होते. बालपणी त्याचा रस संगीतातही होता. वयाच्या आठव्या वर्षी तो शहनाई वाजवण्यास शिकला. ज्या शाळेत अभ्यासासोबत संगीतही शिकवले जाते, अशा शाळेत त्याने प्रवेश घेतला. शहनाईवर त्याचे इतके प्रेम होते की, शाळा संपल्यानंतरसुद्धा तो घरी जात नव्हता. शाळेतच सराव करायचा. तीन वर्षांतच ताे शहनाईत इतका पारंगत झाला की त्याला शाळेत स्कॉलरशिप मिळू लागली. तो क्रिकेट तर फक्त गरमीच्या सुट्यांत खेळायचा. क्रिकेटपेक्षा त्याचा अधिक रस संगीतात होता. शहनाईशिवाय त्याने पियानो आणि सॅक्सोफोनसुद्धा वाजवणे शिकले. त्याचे सहकारी त्याला एक उत्तम कुक (स्वयंपाकी) मानतात. इंग्लंडची टीम दौऱ्यावर असते तेव्हा तो अापल्या सहकाऱ्यांसाठी कधी-कधी आवडती डिशही तयार करतो.
क्रिकेटमध्ये कुकची सुरुवात अत्यंत फिल्मी स्टाइलने झाली. एकदा मेरिलबोर्न क्रिकेट क्लबचा (एमसीसी) संघ त्याच्या शाळेचा संघ बेडफोर्ड इलेव्हनशी लढण्यासाठी अाला. बेडफोर्ड इलेव्हनमध्ये तेव्हा एक खेळाडू कमी पडत होता. तेव्हा संघपूर्ती करण्यासाठी एका १४ वर्षांच्या खेळाडूला संघात सामील करण्यात आले. तो कुक होता. कुकने त्या सामन्यात शतक ठोकले. येथून त्याचे क्रिकेट करिअर सुरू झाले. पुढच्या चार वर्षांत त्याने ८७.९० च्या सरासरीने ४३९६ धावा ठोकल्या. यात १७ शतके आणि २ द्विशतके झळकावली. त्याला शाळेचा कर्णधार बनवण्यात आले. क्रिकेटसोबत त्याचे संगीतही सुरूच होते. त्याला म्युझिक साेसायटीचे अध्यक्षही बनवण्यात आले. यादरम्यान त्याला संगीतात योगदानासाठी तीन वेळा एक्सलन्स अवाॅर्डही मिळाले. कुकने २०११ मध्ये बालपणाची मैत्रीण एलिस हंटशी लग्न केले. त्याला दोन मुली एल्सी आणि इसाबेल आहेत. कुकने “द डेली टेलिग्राफ’ आणि “मेट्रो’ या दैनिकासाठी कॉलम लिहिले आहे. त्याने एका अॅडव्हेंचर म्युझिक सिरीजसाठी सॅक्सोफोन वाजवले आहे. मित्रांत कुकीज नावाने प्रसिद्ध कुकला गोडपदार्थ खूप आवडतात. बालपणी त्याने एकदा घराजवळील मिठाईच्या दुकानात चोरी केली होती. कुकला कोणत्याही गोलंदाजाची भीती वाटत नाही. मात्र, तो सापाला घाबरतो. साप चावतानाचे स्वप्न अनेक वेळा पडल्याचे त्याने एकदा मुलाखतीत सांगितले होते. इंग्लंडचा कुक अनेक चॅरिटेबल संस्थेशी संलग्नित आहे. साडेपाच कोटी रुपये संपत्तीचा मालक कुक ब्रेस्ट कॅन्सरसाठी चॅरिटी रेसमध्ये धावला आहे.
कुकचे विक्रम
{ इंग्लंडकडून सर्वाधिक १३६ कसोटी खेळणारा खेळाडू.
{ इंग्लंडकडून सर्वाधिक १०,८३९ कसोटी धावा काढणारा.
{ पहिल्या पाच कसोटींत शतक ठोकणारा एकमेव कर्णधार.
अवाॅर्ड
{ विस्डन क्रिकेटर
ऑफ द इयर.
{ आयसीसी ‘टेस्ट प्लेअर ऑफ द इयर’
{ कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर
बातम्या आणखी आहेत...