आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All 3 South African Squads Announced For India Tour

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण आफ्रिका करणारा भारताचा दाैरा; भारताविरुद्ध तीन कर्णधारांची निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केपटाऊन - दिग्गज हाशीम आमला, एल्बी डिव्हिलर्स आणि फाफ डुप्लेसिस या तीन कर्णधारांच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका टीम ७२ दिवसांचा भारत दाैरा करणार आहे. या दाैर्‍यातील महात्मा गांधी- मंडेला क्रिकेट मालिकेला येत्या २ आॅक्टाेबरपासून प्रारंभ हाेणार आहे. या वेळी आफ्रिकेच्या कसाेटी टीमचे नेतृत्व हाशीम आमला करणार आहे. तसेच वनडे टीमच्या नेतृत्वाची धुरा एल्बी डिव्हिलर्सकडे साेपवण्यात आली. फाफ डुप्लेसिस टी-२० टीमच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे.

पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ आणि यजमान भारत यांच्यात चार कसाेटी, पाच वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका हाेणार आहे. आफ्रिकेचा हा ७२ दिवसांचा दाैरा आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने नुकतीच तिन्ही मालिकांसाठी कर्णधार आणि राष्ट्रीय टीमची घाेषणा केली.

असा राहणार ७२ दिवसांचा दाैरा
०२ आॅक्टाेबर पहिला टी-२०
०५ आॅक्टाेबर दुसरा टी-२०
८ आॅक्टाेबर तिसरा टी-२०
११ आॅक्टाेबर पहिला वनडे
१४ आॅक्टाेबर दुसरा वनडे
१८ आॅक्टाेबर तिसरा वनडे
२२ आॅक्टाेबर चाैथा वनडे
२५ आॅक्टाेबर पाचवा वनडे
५ ते ९ नाेव्हेंबर पहिली कसाेटी
१४ ते १८ नाेव्हेंबर दुसरी कसाेटी
२५ ते २९ नाेव्हेंबर तिसरी कसाेटी

पुढे वाचा, कसे असेल मालिकेत टीमचे नेतृत्व