टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्याच्या पहिल्या सामन्यातच पराभव स्विकारावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलियात पर्थमध्ये मंगळवारी पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना झाला. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने नाबाद दीड शतक (171*) ठोकले. परंतु ते व्यर्थ ठरले. विराट कोहलीने देखील शानदार कामगिरी (91धावा) केल्या. इतकेच नव्हे तर कांगारुंचे दोन्ही ओपनर्स झटपट तंबूत परतले, तरीही टीम इंडियाचा पराभव झाला.
टीम इंडियाने कांगारुंसमोर विजयासाठी 309 धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीव्हन स्मिथ (149) आणि जॉर्ज बेली (112) यांच्या जानदार आणि शानदार शतकी खेळीच्या जोरावर 5 गडी राखून विजय मिळवला. याविजयासोबत ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.
ही आहेत टीम इंडियाच्या पराभवाची पाच मुख्य कारणे...
1. खराब अंपायरिंग
2. धोनीचा अश्विनवर असलेला अति आत्मविश्वास.
3. स्मिथ-बेलीची जबरदस्त फलंदाजी.
4. जडेजा-उमेश-भुवनेश्वर फ्लॉप
5. 17 अतिरिक्त धावा
सामन्यात हे चमकले
- रोहितने 163 चेंडूत केल्या बिनबाद 171 धावा ठोकल्या. यात 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश.
- विराटने 97 चेंडूत 9 चौकार आणि एक षटकार ठोकत 91 धावांची खेळी केली.
- स्मिथने (149) कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करत 135 चेंडूत 11 चौकार आणि दोन षटकार लगावले.
- बेलीने 112 धावा करताना 7 चौकार आणि दोन षटकार खेचले. स्मिथचे 5 वे तर बेलीचे हे तिसरे एक दिवसीय शतक होते.
- डेब्यू स्टार सरन भारतासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याने 9.2 षटकांत 56 धावा देत 3 गडी बाद केले.
- धोनीने सामन्यात एकूण 7 गोलंदाजांचा प्रयोग केला. यात विराट कोहली, आणि रोहित शर्माचाही समावेश होता.
पुढील स्लाइडवर वाचा, टीम इंडियाच्या पराभवाची इतर कारणे...