जेव्हा 2015 च्या सुरुवातीला कंगारू संघ विश्व विजेता ठरला. तेव्हा कुणालाही वाटत नव्हते की हा संघ थोड्याच महिन्यात विखुरला जाईल. मात्र तसे झाले! केवळ एका मालिकेतील पराभव आणि मॅनेजमेंटचे काही चुकीचे निर्णय यामुळे हा संघ पार अर्धा झाला.
क्रिकेटमध्ये जय-पराजय या गोष्टी सुरूच असतात, मात्र जेव्हा गोष्ट स्वाभिमानावर येऊन थांबते तेव्हा सत्यानासच होतो. अशा वेळी अनेकदा बरोबर वाटणारे निर्णय चुकतात. काहीसे असेच झाले अॅशेस सीरीज हरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे. पाहता- पाहता या संघातील पाच खेळाडूंनी निवृत्ती घेतली. काहींनी दुखापतीचे कारण दाखवले. तर काहींनी दबावात आल्याने आपले करिअर संपवले.
अॅशेसच्या आधीपासूनच सुरू होता तमाशा
असे नाही की, निवृत्तीची सुरूवात अॅशेस पराभवानेच झाली. खरे कारणर तर हे आहे, जेव्हा टोर्नामेंटसाठी संघ निवडला गेला तेव्हा, त्यात फास्ट बॉलर रेयान हॅरिसचे नाव नव्हते. मॅनेजमेंटने दुखापतीचे कारण सांगून त्याला बाहेर ठेवले. मात्र हॅरिस स्वतःला अॅशेससाठी फिट समजत होता. मग काय, त्याने रागाच्या भरात निवृत्तीची घोषणा करून टाकली. त्याने वर्ल्ड कपच्या आधी भारताविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये तीन सामन्यात खेळताना 10 विकेट घेतल्या होत्या.
भिडल्या WAGs
जेव्हा कांगारू संघ 1-3 ने पराभूत झाला तेव्हा क्लार्कची पत्नी केली आणि स्टीवन स्मिथची गर्लफ्रेंड डॅनी विल्स यांच्या भांडनाचे वृत्तही आले. केलीचे म्हणणे होते की, स्मिथ मुद्दामहून चांगले खेळत नाही. यावर डॅनीने केलीवर जबरदस्त हल्ला केला होता.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या निवृत्तीचे खरे कारण...