डांबुला- श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे सीरीजमधील चौथ्या मॅचमध्ये यजमान संघाचा कर्णधार अॅंजेलो मॅथ्यूज बाल-बाल बचावला. बॅटिंगदरम्यान मॅथ्यूजच्या डोक्यावर एक बाउंसर आदळला. ज्यामुळे त्याच्या हेल्मेटचा बॅक फ्लॅप तुटला. मात्र, याच फ्लॅपमुळे मॅथ्यूज बचावला. काहीसे याच प्रकारे झालेल्या दुर्घटनेत दोन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फिल ह्यूज याचा मृत्यू झाला होता. बॅक फ्लॅपमुळे वाचला मॅथ्यूजचा जीव...
- ही घटना श्रीलंकेच्या डावादरम्यान 13 व्या षटकात घडली. जेव्हा स्कॉट बोलँडचा एक बाऊंसर चेंडू 140 KM/H इतक्या वेगाने सरळ मॅथ्यूजच्या हेल्मेटला लागला.
- बॉल लागताच एंजेलोच्या हेल्मेटवर असलेला बॅक फ्लॅप तुटून पडला. मात्र, या बॅक फ्लॅपला चेंडू जोरात लागल्याने मॅथ्यूजचा जीव वाचला.
- जर बॅक फ्लॅप नसता तर हा चेंडू सरळ अॅजेलोचा गळ्यावर लागला असता. ज्यामुळे खूपच गंभीर घटना घडली असती.
- अशाच पद्धतीच्या अपघातामुळे दोन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिल ह्यूज याचा जीव गेला होता.
- घटना घडली तेव्हा ह्यूजने हेल्मेट तर घातले होते मात्र त्यावर बॅक फ्लॅप घातले नव्हते.
- ज्यामुळे तो बॉल त्याच्या मानेवर जाऊन जोरात आदळला. तसेच मेंदूच्या नसांना गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
फिल ह्यूजचा झाला होता मृत्यू -
- अॅजेलोसोबत जशी घटना घडली तशीच घटना ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फिल ह्यूज याच्यासोबत नोव्हेंबर 2014 घडली होती. ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.
- सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफील्ड शील्ड ट्रॉफीदरम्यान एका मॅचमध्ये ह्यूज 63 धावावर खेळत असताना हा प्रसंग ओढावला होता.
- तो न्यू साउथ वेल्सचा बॉलर सीन एबोटच्या एका बॉलवर हुक करताना पुढे आला आणि चूकला.
- त्याचदरम्यान एबॉटचा चेंडू जोराने ह्यूजच्या मानेवर आदळला. तो जागेवरच कोसळला. त्याच्या मेंदूच्या नसांना जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कशी घडली ही घटना...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)