आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेस्ट इंडीज दौ-यासाठी भारतीय संघ रवाना, खेळाडूंनी शेअर केले INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून- शार्दुल ठाकुर, उमेश यादव, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन आणि रवींद्र जडेजा. - Divya Marathi
डावीकडून- शार्दुल ठाकुर, उमेश यादव, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन आणि रवींद्र जडेजा.
स्पोर्ट्स डेस्क- सुमारे दीड महिन्याच्या वेस्ट इंडीज दौ-यासाठी भारतीय संघ मंगळवारी रवाना झाला. भारतीय संघासोबत अनिल कुंबळेसुद्धा उपस्थित आहेत. एक प्रशिक्षक म्हणून कुंबळे यांचा हा पहिलाच दौरा व मालिका आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी विमान प्रवासातील आतीलस फोटोज सोशल मीडिया शेअर केले आहेत. रोहित शर्माने लिहले की, 'येथूनच दौरा सुरु होतो.' 21 जुलैला पहिली कसोटी...
- भारतीय संघ 9 जुलैला सेंट किट्‍समध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन विरूद्ध दोन दिवसीय सराव सामन्याने दौ-याची सुरूवात करेल.
- भारत त्यानंतर याच मैदानावर 14 ते 16 जुलै दरम्यान तीन दिवसीय सराव सामना खेळेल.
- भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात एंटीगुआमधील विवियन रिचर्ड्‍स मैदानावर 21 ते 25 जुलैला पहिला कसोटी सामना खेळवला जाईल.
- यानंतर किंग्सटनमध्ये 30 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल.
- तिसरी कसोटी सेंट लुसियाला 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान होईल.
- चौथी आणि शेवटची कसोटी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये क्वींस पार्क ओवल मैदानावर 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान होईल.
- भारताने याआधी 2011 मध्ये वेस्ट इंडीज दौरा केला होता. भारताने ती मालिका 1-0 अशी जिंकली होती.
वेस्ट इंडीज दौ-यासाठी अशी आहे टीम इंडिया-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, स्टुअर्ट बिन्नी.

पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, भारतीय खेळाडूंनी शेअर केलेली विमानामधील फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...