आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Anil Kumble Has Told Players, IF YOU Are Late For The Bus, Be Ready To Pay $50

शिस्तीसाठी कुंबळेंची नवी आयडिया, बसमध्ये येण्यास उशीर झाल्यास 50 डॉलर दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली... - Divya Marathi
प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली...
नेविस- भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी खेळाडूंना शिस्त लावण्यासाठी नवी आयडिया आणली आहे. जर एखाद्या खेळाडूला ठरलेल्या वेळेनुसार बसमध्ये येण्यास उशीर झाला तर त्याने 50 डॉलर देण्याची तयारी ठेवावी असे आदेश काढले आहेत. वक्तशीरपण व शिस्तीचा भाग म्हणून कुंबळेंनी हा मार्ग शोधला आहे. त्यांनी हे म्हटले आहे की, प्रत्येक चौथ्या दिवशी संघासोबत ऑफिशियल मीटिंग करतील. याला खेळाडूंची उपस्थिती गरजेची असेल. वेस्ट इंडिज दौ-यावर आहे भारतीय टीम...
- वेस्ट इंडिजच्या मोठ्या दौ-यावर आलेल्या भारतीय संघासोबत अनिल कुंबळेंनी मंगळवारी मिटिंग केली. यात सपोर्ट स्टाफही उपस्थित होता.
- इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कुंबळेनी संघातील खेळाडूंना सांगितले की, यापुढे आपण चार दिवसाला एक मिटिंग घेणार आहोत. यादरम्यान जर एखाद्या खेळाडूला काही समस्या मांडायची असेल किंवा आपले म्हणणे मांडायचे असेल तर तो थेट प्रशिक्षकसोबत वन-टू-वन चर्चा करू शकतो.
- टीमशी जोडल्या गेलेल्या एका सदस्याने सांगितले की, सर्व काही नियोजनामुळे होत आहे. कुंबळेंचे म्हणणे आहे की, खेळाडूंना पूर्ण स्वतंत्र्य दिले पाहिजे त्याच बरोबर त्यांना जबाबदारी व शिस्तीची जाणीव असायला हवी. संघातील वातावरण चांगले राहण्यासाठी कुंबळे संघाला स्कूबा डायविंगवर घेऊन जाणार आहेत.
नव्या आयडियाजवर काम करताहेत कुंबळे-
- भारतीय संघ वेस्ट इंडीज दौ-यावर रवाना होण्याआधीच कुंबळेंनी बंगळुरु कॅम्पमध्ये काही नव्या आयडियाज वापरल्या होत्या.
- यात एक मोठा प्रोग्राम होता. ही आयडिया खरी 2001 मध्ये कोच राहिलेले जॉन राईट यांच्या प्लानचा भाग होता. यात दोन क्रिकेटर्सची जोडी बनविली जाते कारण ते एकत्र राहावेत. तसेच त्यांच्यात संवाद घडावा आणि एकमेंकाच्या मदतीसाठी तयार रहावेत.
- कुंबळेंनी चेतेश्वर पुजारा आणि अमित मिश्राची जोडी बनविली. स्टुअर्ट बिन्नी-रोहित शर्मा तर विराट कोहली-भुवनेश्वर यांची जोडी लावली.
- बंगळुरु कॅम्पमध्ये कुंबळेंनी टीम कोहलीला मार्गदर्शन करण्यासाठी धोनी, राहुल द्रविड़, संदीप पाटिल आणि वेंकटेश प्रसाद यांना बोलावले होते.
- या कॅम्पमध्ये संघातील खेळाडूंनी कुंबळे सरांकडे तक्रार केली बोर्ड त्यांना पुढील महिन्यांचे वेळापत्रकाबाबत पूर्ण माहिती देत नाही. त्यामुळे खासगी कामावर त्याचा परिणाम होतो.
- खेळाडूंनी यावरही नाराजी व्यक्त केली की, मोठी मालिका किंवा विदेश दौरे हे मिनी आयपीएल आणि दुलीप ट्रॉफी दरम्यानच का ठेवली जाते?.
अशी होईल कसोटी मालिका-
पहिली कसोटी- 21 जुलै ते 25 जुलै, एंटिगुआ
दूसरी कसोटी- 30 जुलै ते 3 ऑगस्ट, जमैका
तिसरी कसोटी- 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, सेंट लुसिया
चौथी कसोटी- 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट, क्वीन्स पार्क ओवल
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...