आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंच्या आक्रमकतेवर लगाम लावणार नाही- कुंबळे; तिसरी कसोटी रंगणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- टीम इंडियातील खेळाडूंच्या आक्रमकतेवर लगाम लावणार नाही. उलट त्यांना आक्रमकतेसह अधिक चांगला खेळ करण्यास प्रेरित करेल, असे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गुरुवारपासून येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान मालिकेतील तिसरी कसोटी रंगेल. या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना ठरणार असून, या सामन्यासह रांची हे देशातील २६ वे कसोटी केंद्र बनेल. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ ने बरोबरीत असून, खेळपट्टी दोन्ही संघांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. 

धुळवडीच्या दिवशी दोन्ही संघ रांचीत पोहोचले. दोन्ही संघांनी सोमवारी विश्रांतीला प्राधान्य दिले. मंगळवारी दोन्ही संघांनी कसून सराव करून रणनीती बनवली. सकाळी ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्मिथच्या नेतृत्वात सराव केला. कांगारुंनी नेटवर घाम गाळला. टीम इंडियाने कोहलीसह सराव केला. भारतीय खेळाडूंनी झेल घेण्याचा सरावाला प्राधान्य दिले.

आक्रमकता रोखणार नाही
बंगळुरुत मिळालेल्या दमदार विजयानंतर टीम इंडिया रांचीतही आक्रमकतेने खेळणार असल्याचे संकेत कुंबळे यांनी दिली. टीम जिंकत असताना खेळाडूंच्या आक्रमकतेवर लगाम लावणार नाही. आधीच्या भारतीय संघातही दम होता. मात्र, या संघातील खेळाडूंची स्वत:ला व्यक्ती करण्याची वेगळी पद्धत आहे. एका दिवसात ९० षटके असतात. यादरम्यान खेळाडूंचा उत्साह कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हटले. मैदानात झालेल्या वादाचा खेळावर परिणाम पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

माहीची उणीव जाणवेल  
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शानदार खेळाडू आणि कर्णधार राहिला आहे. टीम इंडिया धोनीच्या शहरात खेळणार आहे. रांचीत खेळताना आम्हाला त्याची उणीव नक्की जाणवेल. येथे पहिल्यांदा कसोटी होत असून, धोनीची उणीव जाणवणारच आहे. धोनीची उपस्थिती प्रेरणादायी असते. तो ही कसोटी पाहण्यास आला तर आनंद होईल, असेही कुंबळे म्हणाले.

लॉयन आशान्वित 
ऑस्ट्रेलियाचा जखमी फिरकीपटू नॅथन लॉयनला  १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत फिट होऊन खेळण्याची आशा आहे. २९ वर्षीय लॉयनच्या बोटाला दुसऱ्या कसोटीदरम्यान दुखापत झाली होत. जखमी स्टार्कच्या जागी संघात आलेला ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज पॅट कमिन्स भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे. 
 
खेळपट्टी ‘खराब’ करण्याची सध्या भारतात आली साथ
मुंबई-
आयसीसीच्या धाकालाही न जुमानता भारतात कसोटी क्रिकेटसाठी दर्जाहीन खेळपट्ट्या तयार करण्याचे सध्या पेव फुटले आहे. पहिल्या चेंडूपासून माती निघणाऱ्या खेळपट्टीची छुपी मागणी भारतीय खेळाडू करतात आणि ‘क्युरेटर’ ती बिनधास्तपणे पूर्णही करताहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे रांची येथील केंद्रही या गोष्टीला अपवाद नाही. त्यातच ‘क्युरेटर’ एस. बी. सिंग यांनी आपण तीन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या असून त्यातील एकाची निवड भारतीय संघ कसोटी आधी दोन दिवस करणार आहे, असे विधान करून या वादाच्या आगीत तेल ओतले आहे. 

मुळातच अशी मागणी यजमान करणे रास्त व नियमाला धरून नाही. संघातील खेळाडू किंवा कप्तान ही मागणी चलाखीने करतात. थेट क्युरेटरला भेटून सांगण्याऐवजी खेळाडू खेळपट्टी तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख दलजितसिंग यांना सांगतात. दलजितसिंग ही मागणी विभागीय ‘क्युरेटर’ समितीच्या प्रमुखामार्गे प्रत्यक्ष खेळपट्टी तयार करणाऱ्या व्यक्तीकडे पोहोचवतात.  

खरं तर अशी मागणी करणे हा गुन्हा आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे गेली २० वर्षांहून अधिक काळ वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी तयार करणारे सुधीर नाईक म्हणाले, ‘कसोटी सामन्यासाठी अशा तीन वेगवेगळ्या खेळपट्ट्या तयार करताच येत नाहीत. मध्यभागी असणारी खेळपट्टी हीच मुख्य खेळपट्टी असते व त्या खेळपट्टीलाच कसोटीसाठी तयार करावे लागते. यजमान संघ किंवा कप्तानाच्या मर्जीने खेळपट्टी तयार करता येत नाही, तर तो संपूर्ण अधिकार ‘क्युरेटरचा’ असतो.’
बातम्या आणखी आहेत...