आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रेसिंग रूममध्ये भारतीयता दिसायला हवी, वरिष्ठांना द्यावा आदर- कुंबळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंबळे म्हणाले, मी असा संघ बनवू इच्छितो की, त्यात भारतीयता नजरेत भरेल. - Divya Marathi
कुंबळे म्हणाले, मी असा संघ बनवू इच्छितो की, त्यात भारतीयता नजरेत भरेल.
नवी दिल्ली- टीम इंडियाचा नवे हेड कोच अनिल कुंबळेंनी म्हटले आहे की, ड्रेसिंग रूममध्ये इंडियननेस म्हणजेच भारतीयता दिसून आली पाहिजे. संघातील सदस्यांनी स्वत:ला एका मोठ्या परिवारातील हिस्सा समजावे तसेच वरिष्ठ खेळाडूंचा आदरही केला पाहिजे. मात्र, कुंबळेंनी हे ही स्पष्ट केले की, याचा अर्थ असा नाही की, फक्त आदेशाचे पालन करणे. येथे प्रत्येक खेळाडूला आपला विचार मांडण्याचे स्वतंत्र्य दिले जाईल. आणखी काय म्हणाले कुंबळे....
- एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कुंबळेंनी सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तरे दिली.
- प्रशिक्षकपदाच्या नव्या जबाबदारीबाबत छेडले असता जंबो नावाने प्रसिद्ध असलेल्या लेग स्पिनरने सांगितले की, याचा विचार मला यंदा युरोपमध्ये सुट्टी घालवत असताना आला होता. माझ्या पत्नीनेही मला होकार दिला. जर पत्नी आणि मुलांनी होकार दिला नसता तर ही जबाबदारी पेलणे अवघड गेले होते. मी एक शालेय मुलांचा पालक आहे.
- अनिल यांनी मान्य केले की, खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात खूपच फरक आहे. मी आरसीबी आणि मुंबई इंडियन्ससोबत काम पाहिले आहे. त्यामुळे मला यातील बारकावे माहित आहेत. एक प्रशिक्षक म्हणून त्याने खेळाडूशी फ्रेंडली राहणे आणि त्यांच्यात मित्रत्त्वाचे नाते तयार होणे गरजेचे असते. योग्य नियोजनाचीही नितांत गरज असते.
जॉन राईटपासून प्रेरणा-
- कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 विकेट घेतलेला महान लेग स्पिनरचे म्हणणे आहे की, मी जॉन राईटच्या कोचिंग स्टाईलला खूप पसंत करतो. त्यांच्याकडे खूप नव्या कल्पना असायच्या. ते नेट्समध्येही पूर्ण तयारीने यायचे. फील्डिंग आणि बॉलिंग ग्रुप बनवून प्रॅक्टिस करून घेणे ही त्यांची खूबी होती. तसेच त्यांच्या डोक्यात कितीही कल्पना असल्या तरी ते खेळाडूवर कधीच लादत नव्हते.
- तुम्ही कशी टीम बनवू इच्छिता असा प्रश्न केला असता अनिल कुंबळे म्हणाले, मला अशी टीम बनवायला आवडेल ज्यात फक्त भारतीयता हाच विचार असेल. भारतीयता दिसून आली तर तेथे संस्कृतीचा प्रभाव पडतो. जेथे वरिष्ठांचा आदर्श ठेवला जातो. यासोबत नव्या खेळाडूंनाही आपले विचार मांडता आले पाहिजे. त्यांच्या म्हणण्यातही एक विचार, आधुनिकता असू शकते. या सर्वांचा मेळ घालायला मला आवडेल. मी स्कूल मास्टरप्रमाणे संघ घडवू इच्छित नाही.
- खेळ म्हटले की, स्लेजिंग आलेच त्यात काहीच चूकीचे नाही. मात्र, मर्यादा व सभ्यता पाळली पाहिजे.
पुढे वाचा, दिवसरात्र कसोटीचा आताच विचार करण्याची गरज नाही- कुंबळे
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...