आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकित बावणे, विजय झोलची निवड, रणजीसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदाच्या रणजी सत्रासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. रणजी संघात भारतीय संघाचा युवा फलंदाज केदार जाधव, औरंगाबादचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच जालन्याचा विजय झोल यांची संभाव्य संघात निवड झाली आहे. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित मोटवाणीकडे देण्यात आली आहे.

यंदा रणजी सत्रातील संघात मुर्तझा ट्रंकवाला ऐवजी नौशाद शेखला संधी देण्यात आली आहे. हा एकमेव बदल करण्यात आला. अंकित बावणेने गत सत्रात गुजरात आणि विदर्भाविरुद्ध शानदार शतके झळकावली होती. महाराष्ट्राचा पहिला सामना हरियाणाविरुद्ध ते ऑक्टोबरदरम्यान पुणे येथे होईल.

संघ पुढीलप्रमाणे
रोहितमोटवाणी (कर्णधार), हर्षद खडीवाले, स्वप्निल गुगळे, केदार जाधव, अंकित बावणे, चिराग खुराणा, राहुल त्रिपाठी, संग्राम अतितकर, नौशाद शेख, विजय झोल, अक्षय दरेकर, श्रीकांत मुंढे, समद फल्लाह, निकित धुमाळ, डोमनिक मुथ्थास्वामी, अनुपम सकलेचा.