आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा गुणवंत क्रिकेटपटू अंकित बावणेची भारत अ संघात निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- औरंगाबादचा गुणवंत क्रिकेटपटू अंकित बावणेची आगामी द. आफ्रिका दाैऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड झाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शनाचे अंकित बावणेला फळ मिळाले. अंकितची चारदिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघात निवड झाली. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारत अ संघाचा कोच आहे. या वेळी भारत अ संघाच्या वनडे संघाचीही घोषणा करण्यात आली.
  
भारत अ संघ जुलैमध्ये सुरू होत असलेल्या द. आफ्रिकेच्या आगामी दाैऱ्यात तिरंगी मालिका खेळेल. यानंतर यजमान द. आफ्रिकेविरुद्ध दोन चारदिवसीय सामन्यांत लढेल. मनीष पांडे भारत अ वनडे संघाचा, तर करुण नायर चारदिवसीय संघाचा कर्णधार असेल. मालिकेत सुरुवातीला तिरंगी वनडे मालिका होईल. यात भारत अ, द. आफ्रिका अ आणि ऑस्ट्रेलियाचा अ संघ सहभागी होईल.   
  
आयपीएल व विजय हजारे करंडकात शानदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची भारत अ वनडे संघात निवड झाली, तर रणजी ट्रॉफीत मैदान गाजवणाऱ्यांची चारदिवसीय संघात निवड झाली. अष्टपैलू हार्दिक व कृणाल पंड्याची भारत अ वनडे संघात निवड झाली.

दोन्ही संघ असे 
भारत अ एकदिवसीय संघ :
मनीष पांडे (कर्णधार), मनदीपसिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, ऋषभ पंत, विजय शंकर, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, जयंत यादव, बसील थम्पी, मो. सिराज, शार्दूल ठाकूर, कौल.  

भारत अ चारदिवसीय संघ : करुण नायर (कर्णधार), प्रियांक, अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, सुदीप चटर्जी, ईशान किशन, हनुमान तिवारी, जयंत यादव, शाहबाज नदीम, नवदीप सैनी, मो. सिराज, शार्दूल ठाकूर, अनिकेत चौधरी, ए. राजपूत.
बातम्या आणखी आहेत...