Home | Sports | From The Field | Ankitche not out 100

अंकितचे नाबाद शतक; युवांची अाघाडी; कर्णधार पार्थिव पटेलचे नाबाद अर्धशतक

वृत्तसंस्था | Update - Oct 02, 2017, 03:00 AM IST

यजमान भारत अ संघाने अापल्या घरच्या मैदानावरील दबदबा कायम ठेवताना रविवारी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दुसऱ्या अनअाॅफिशियल

 • Ankitche not out 100
  विजयवाडा- यजमान भारत अ संघाने अापल्या घरच्या मैदानावरील दबदबा कायम ठेवताना रविवारी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दुसऱ्या अनअाॅफिशियल कसाेटीत माेठी अाघाडी घेतली. अाैरंगाबादच्या प्रतिभावंत फलंदाज अंकित बावणेने (११६) धडाकेबाज नाबाद शतकाच्या बळावर भारत अ संघाची अाघाडी निश्चित केली. त्याने पार्थिव पटेलसाेबत (नाबाद ५६) पाचव्या विकेटसाठी अभेद्य दीडशतकी भागीदारी रचली. यामुळे भारत अ संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ४ गड्यांच्या माेबदल्यात ३६० धावा काढल्या. यासह यजमानांनी दिवसअखेर १४९ धावांची अाघाडी मिळवली. न्यूझीलंड अ संघाला २११ धावांत अापला पहिला डाव गुंडाळावा लागला. अाता भारताकडून अंकित बावणे अाणि पार्थिव पटेल मैदानावर खेळत अाहेत. भारताने कालच्या १ बाद ३३ धावांवरून सुरुवात केली.

  श्रेयस-प्रियांकची शतकी भागीदारी
  भारताकडून सलामीवीर प्रियांक पांचाळने युवा फलंदाज श्रेयस अय्यरसाेबत तुफानी फटकेबाजीची लय कायम ठेवली. या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी टीमच्या धावसंख्येला गती दिली. दरम्यान, शतकाच्या वाटेवर असलेल्या श्रेयसला साेधीने बाद केले. त्यामुळे त्याला ७९ चेंडूंत ८२ धावांची खेळी करता अाली. यात १० चाैकार अाणि २ षटकारांचा समावेश अाहे. त्यापाठाेपाठ पांचाळ बाद झाला. त्याचे चार धावांनी अर्धशतक हुकले. त्याने ९४ चेंडूंत ७ चाैकारांसह ४६ धावा काढल्या.
  शतकवीर अंकितचे सर्वाधिक षटकार
  अाैरंगाबादच्या गुणवंत फलंदाज अंकित बावणेने नाबाद शतक ठाेकले. त्याने १६६ चेंडूंचा सामना करताना १३ चाैकार व ५ षटकारांच्या अाधारे ११६ धावा काढल्या. यासह त्याने सामन्यात दाेन दिवसांत सर्वाधिक षटकार ठाेकून अापली झंझावाती फलंदाजी सिद्ध केली.

Trending