आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anuja Patil's All round Heroics Guide India To 34 run Win Over Srilanka

टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - यजमान भारतीय महिला टीमने साेमवारी श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. भारतीय महिला टीमने सलामीच्या सामन्यात ३४ धावांनी शानदार विजयाची नाेंद केली. यासह यजमान टीमने श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली.

महाराष्ट्राच्या अनुजा पाटीलने (२२ धावा, ३ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने सामना जिंकला. यासह यजमानांना आघाडी घेता आली. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांमध्ये सहा बाद १३० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरामध्ये पाहुण्या श्रीलंका टीमला ७ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या ९६ धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंका टीमकडून सुरंगिकाने सर्वाधिक नाबाद ४१ धावांची केलेली खेळी व्यर्थ ठरली. भारताच्या धारदार गाेलंदाजीच्या समाेर श्रीलंकेच्या महिला फलंदाज फार काळ आव्हान कायम ठेवू शकल्या नाहीत. तत्पूर्वी भारताला दमदार सुरुवात करता आली नाही. सलामीवीर आणि कर्णधार मिताली राज (३) आणि वनिथा (१२) स्वस्तात बाद झाल्या. मानधना (३५) आणि हरमीत काैरने (३६) तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.

अनुजाचे तीन बळी
भारताकडून गाेलंदाजीत काेल्हापूरच्या अनुजा पाटीलने तीन बळी घेतले. तिने चार षटकांमध्ये १४ धावा देत हे यश संपादन केले. तसेच दीप्ती शर्माने २ विकेट घेतल्या. एकता बिस्ट आणि पूनम यादवला प्रत्येकी एक गडी बाद करता आला.