आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का विराटवर नाराज, जाणून घ्या काय आहे नाराजीचे कारण....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा विराट कोहलीवर जाम अपसेट आहे. - Divya Marathi
अनुष्का शर्मा विराट कोहलीवर जाम अपसेट आहे.
सध्या लव्ह बर्ड्स म्हणून चर्चेत असलेल्या आनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यात सर्व काही ठीक नाही. मिळालेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्का यांच्यात लग्नाच्या मुद्यावरून खटके उडाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काची विराटबरोबर लवकरातलवकर लग्नाच्या बंधनात अडकायची इच्छा आहे. मात्र विराट कोहलीची तुर्तास तशी काही इच्छा दिसत नाही. त्याला त्याच्या क्रिकेट करीयरवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे वाटते. यामुळे त्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या या निर्णयामुळे अनुष्का जाम अप्सेट झाली आहे.
अनुष्काचे विराट कोहलीबरोबर कडाक्याचे भांडन झाले आहे. तीने जालंधर येथे होत असलेल्या हरभजन आणि गीता बसरा यांच्या लग्नाला विराट बरोबर उपस्थित राहण्यासही नकार दिला. या आधी अनुष्का या लग्नाला उपस्थित राहणार होती. मात्र आता विराटबरोबर झालेल्या भांडणामुळे, त्याच्याबरोबर या लग्नाला उपस्थित राहण्याची तिची इच्छा नाही.
येथे लक्षात घ्यायला हवे की, अनुष्का तिच्या विराटबरोबर असलेल्या रिलेशनशिपवर फार गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का पॅरिसच्या टूरवर गेले होते. तेथील लव्ह लॉक या ब्रिजवर तिने तिच्या आणि विराटच्या नावाचे लॉक लावले हेते. जेव्हा ते मुबईला परतले तेव्हा माध्यमांनी अनुष्काला एअरपोर्टवर घेरले आणि लव्ह लॉकसंदर्भात विचारले तेव्हा अनुष्काने या प्रश्नाला बगल दिली आणि स्मित करून निघून गेली.

पुढील स्लाइड्सवर पाह, विराट आणि अनुष्काचे काही खास फोटो....