आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या खेळपट्टीवर कोणतीही आघाडी सोन्यासारखी : मुंबई कसोटीचा शतकवीर मुरली विजयची प्रतिक्रीया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेले काही दिवस माझा मोठा ‘स्कोअर’ होत नव्हता. ‘ब्रेकमुळे’ मला माझ्या कच्च्या दुव्यांचा पुनर्विचार करता आला; तंत्रात, मानसिक सक्षमतेत सुधारणा करता आली. त्यामुळेच आज मला पुन्हा एकदा फलंदाजीचा सूर गवसला, असे मुंबई कसोटीचा शतकवीर मुरली विजय याने सांगितले. त्याने आपले शतक आपल्या श्रीनाथ या जवळच्या मित्राच्या दिवंगत वडिलांना अर्पण केले. त्यांचे या कसोटीच्या पहिल्याच दिवशी निधन झाले होते.

प्रत्येक वेळी कोहलीत अधिकाधिक सुधारणा झाल्याचेच दिसते. त्यामुळे त्याच्याबाबत मतप्रदर्शन करणे कठीण होऊन बसले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तुकड्या–तुकड्यांमध्ये उत्तम गोलंदाजी केली. मात्र मी व विराट चांगले खेळलो. हेही सत्य नाकारता येत नाही. या खेळपट्टीवर मिळणारी कोणतीही आघाडी ही सोन्यासारखी आहे, असेही तो म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...