आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडच्या खेळाडूंसोबत सचिनच्या मुलाचा कसून सराव, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेटवर गोलंदाजी करताना अर्जुन तेंडुलकर. - Divya Marathi
नेटवर गोलंदाजी करताना अर्जुन तेंडुलकर.
लंडन: सध्या अॅशेज मालिका सुरू आहे. या मालिकेच्या दुसऱ्या टेस्ट आधी इंग्लंडच्या टीमने बुधवारी नेटवर कसुन सराव केला. यावेळी मैदीनावर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनदेखील उपस्थित होता. ट्रेनिंग सेशनमध्ये अर्जुननेदेखील भाग घेतला. त्याने नेटवर बॉलिंगही केली. अर्जुनने बॅन स्टॉक्स आणि अॅलिस्टर कुक याना बॉलिंग केली.

इंग्लंड संघाला होऊ शकतो फायदा
इंग्लंड मालिकेत 1-0 ने पुढे आहे. दूसऱ्या टेस्टमध्ये लेफ्ट आर्म सिमरोंची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार आहे. ऑस्ट्रेलियाचे बॉलर मिचेल स्टार्क आणि मिचेल जॉनसन हे इंग्लंडसाठी धोकादाय सिद्ध होऊ शकतात. अर्जुनदेखील लेफ्ट आर्म मेडियम फास्टर आहे. त्याच्यासह केलेला सराव इंग्लंडच्या फलंदाजांना अधिक फायदेशीर ठरू शकतो.

वसीम अक्रमने व्यक्त केला होता विश्वास
माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमनेदेखील अर्जुन तेंडुलकरचे कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वीच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अक्रम म्हणाला होता, अर्जुन एखादी गोष्ट फार लवकर शिकतो. तो पुढे म्हणाला, ''अर्जुन हा भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका या देशांच्या मुलांसारखाच एक साधारण मुलगा आहे. तो क्रिकेटच्या बाबतीत फार उत्साही आहे. तो त्या बाबतीत अनेक प्रश्नही विचारतो. मी त्याला क्रिकेटशी संबंधित काही टिप्सदेखील दिल्या आहेत.''
पुढील स्लाइड्सवर पाहा, काही संबंधित फोटोज.....