मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 16 वर्षाय मुलगा अर्जुन याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्युनियर क्रिकेट टूर्नामेंटमध्ये शानदार शतक (106 धावा) ठोकले. अर्जुनच्या फलंदाजीची शैली पाहून त्याची तुलना दिग्गज फलंदाज युवराज सिंगसोबत केली जात आहे. अर्जुनच्या संघाने एकूण 218 धावा केल्या. त्यात अर्जुनने 106 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
अर्जुनने या सामन्यात ठोकले शतक
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-16 ज्युनियर क्रिकेट टूर्नामेंटमध्ये चार संघ सहभागी झाले होते. त्यातील रोहित शर्मा इलेवन विरुद्ध सुनील गावसकर इलेवन सामन्यात अर्जुनने शतक ठोकले. मंगळवारी हा सामना झाला. अर्जुन हा सुनील गावसकर इलेवन संघाकडून खेळत होता. सचिन तेंडुलकर इलेवन व दिलीप वेंगसरकर इलवेन संघ देखील मालिकेत सहभागी झाले होते.
पुढील स्लाइडवर वाचा, अर्जुनने याआधी 42 चेंडूत ठोकल्या होत्या 118 धावा...