आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Arsenal’S Hector Bellerin And Bollywood Actress Esha Gupta Spotted In London

स्पॅनिश फुटबॉलर बॉलिवूड अॅक्ट्रेसवर फिदा, या इंडियन लेडीला करतोय डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेलेरिनसोबत ईशा गुप्ता... - Divya Marathi
बेलेरिनसोबत ईशा गुप्ता...
लंडन- स्पॅनिश फुटबॉलपटू हेक्टर बेलेरिनचे जीवन गेल्या काही दिवसांपासून रोमांचक झाले आहे. आधी तर त्याची टीम आर्सेनलने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये चेल्सियाला 3-0 ने हरवले. शिवाय तो नुकताच भारतीय अभिनेत्री ईशा गुप्तासोबत झळकला. ईशा इंग्लिश फुटबॉल क्लब आर्सेनलची चाहती आहे. याआधी ती आर्सेनल-चेल्सिया सामन्याच्या वेळी बेलेरिनला चिअर करताना सुद्धा दिसली होती. बेलेरिनच्या आर्सेनलला केले सपोर्ट...
- भारताच्या इशानेही आर्सेनल टीमच्या किटसोबत आपले बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- दोघे काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये डिनर डेटवर सुद्धा दिसले.
- यामुळे दोघांची मैत्री सर्वांच्या नजरेत आली आहे.
- दोघे एकमेकांसमवेत खूप आनंदी दिसत होते.
- डिनरच्या आधी ईशा जेव्हा बेलेरिनची वाट बघत होती, तेव्हा ती खूप निराश आणि नाराज दिसत होती.
- मात्र, बेलेरिन आला आणि तिला भेटताच तिची निराशा दूर पळाली. ती खूप खुश झाली.
दोघांनी घालवले तीन तास एकत्र-
- दोघांनी एका व्हेज रेस्ट्रॉरंटमध्ये डिनरही घेतले. दोघे रेस्ट्रॉरंटमध्ये जवळपास तीन तास सोबत होते.
- ईशा गुप्ता-बेलेरिन दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि हसत हसत बोलत होते.
- याआधी ईशा आर्सेनलचा डिफेंडर बेलेरिनसोबत त्याच्या मर्सेडिज बेंजमध्ये लाँग ड्राइव्हवर गेली होती.
- यामुळे बेलेरिन आणि ईशा एकमेकांना डेट करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
- दोघांची पहिली भेट लंडन डर्बीमध्ये झाली होती. तेथे दोघांची मैत्री झाली.
- माजी मिस इंडिया इंडरनॅशनल ईशाने राज-3 डी, रुस्तम सारख्या चित्रपटात केला अभिनय अधिक प्रभावी ठरला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, ईशा गुप्ता आणि बेलेरिनचे लंडनमधील फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...