आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेस: ब्रॉडने ऑस्ट्रेलियाचा बँड वाजवला ! दीड तास, ६० धावांत ऑस्ट्रेलिया गारद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉटिंघम- प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत यजमान इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने पाहुण्या ऑस्ट्रेलियन टीमचा पहिल्या डावात धुव्वा उडवला. ब्रॉडचा जबर धक्का बसलेल्या कांगारूंना पहिल्या डावात ६० धावांत गाशा गुंडाळावा लागला. गत २०११ नंतर ऑस्ट्रेलियाची ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. त्यानंतर यजमान टीमने पहिल्या डावात पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २७४ धावा काढल्या. यासह २१४ धावांची आघाडी घेतली.

यजमान इंग्लंडच्या ब्रॉडने शानदार गोलंदाजी करताना १५ धावा देत आठ दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लंड टीम पाच कसोटींच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर अआहे.

ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत गुरुवारी नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार कुकने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसनच्या अनुपस्थितीत ब्रॉडने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात क्रिस रॉजर्स (०) आणि स्टीव्हन स्मिथला (६) तंबूत पाठवून ऑस्ट्रेलिया टीममध्ये खळबळ उडवून टाकली. सलामीवीर रॉजर्सला बाद करून ब्रॉडने कसोटीत आपले ३०० बळी पूर्ण केले. दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही भोपळा न फोडताच सामन्याच्या दुसऱ्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला.

२१ धावांसाठी ऑस्ट्रेलियाला पाच गडी गमावावे लागले. त्यानंतर कांगारूंना ५० चा अाकडा पार करता आला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने यापूर्वी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४७ धावांत गाशा गुंडाळला होता. त्यानंतर या टीमची ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली.

इंग्लंड टीमला आघाडी
पहिल्याच डावात कांगारूंचा धुव्वा उडवणाऱ्या इंग्लंडने पहिल्या दिवसासअखेर गुरुवारी पहिल्या डावात ४ बाद २७४ धावा काढल्या. यासह यजमान टीमने २१४ धावांनी आघाडी घेतली. ज्यो रुट (१२४) व वुड २ खेळत आहेत. गोलंदाजीत स्टार्कने तीन विकेट घेतल्या.

०८ विकेट ब्रॉडने घेतल्या
३०० च्या एलिट क्लबमध्ये सहभागी
२०११ नंतर कांगारूंची सर्वात नीचांकी धावसंख्या

ब्रॉडचे ३०० बळी
ब्रॉडने कसटी करिअरमध्ये ३०० बळी पूर्ण केले. या आकड्याला गवसणी घालणारा ब्रॉड हा इंग्लंडचा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी जेम्स अँडरसन (४१३), बॉथम (३८३), विलिस (३२५) आणि ट्रुमन (३०७) यांनी पराक्रम केला.
एक वेगळा विक्रम
ब्रॉडने आपल्या ८३ व्या कसोटीत एका वेगळ्याच विक्रमाची बरोबरी साधली. त्याने सामन्यात १९ चेंडूंच्या अंतरात पाच बळी घेतले. अशा प्रकारे सर्वात वेगवान पाच बळी घेण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची त्याने बरोबरी साधली. यापूर्वी १९४७ मध्ये आस्ट्रेलियाच्या एर्नी तोशाकने भारताविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत ही कामगिरी केली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, ऑस्ट्रेलिया संबंधित काही- FACTS