आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes: Australia Team Back Foot, England Take Lead

अॅशेस :अाॅस्ट्रेलिया टीमचा धुव्वा; इंग्लंडने मिळवली अाघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात धावा काढताना इंग्लंडचा इयान बेल. - Divya Marathi
अाॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात धावा काढताना इंग्लंडचा इयान बेल.
कार्डिफ - यजमान इंग्लंडने घरच्या मैदानावर सुुरेख कामगिरी करून अाॅस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिकेतील पहिल्या कसाेटीत विजयाचे संकेत दिले. गाेलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी करताना इंग्लंडने अाॅस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०८ धावांत गुंडाळला. त्यामुळे यजमानांना पहिल्या डावात १२२ धावांची अाघाडी मिळाली. त्यानंतर दुस-या डावात दमदार सुरुवात करताना यजमान टीमने शुक्रवारी तिस-या दिवशी वृत्त लिहीपर्यंत ३०.४ षटकांत ३ बाद १२५ धावा काढल्या. यासह इंग्लंडने २४७ धावांची अाघाडी मिळवली हाेती. इयान बेल (नाबाद ३९) व ज्याे रुटने (नाबाद २१) संयमी खेळीसह धावसंख्येचा अालेख उंचावला.
अाॅस्ट्रेलियाने ५ बाद २६४ धावांवरून तिस-या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. मात्र, इंग्लंडच्या गाेलंदाजांनी सुरेख कामगिरी केल्याने कांगारूंना ३०८ धावा काढता अाल्या.
अँडरसन, ब्राॅडचे दाेन बळी
इंग्लंडकडून गाेलंदाजीत तिस-या दिवशी जेम्स अँडरसन अाणि ब्राॅड चमकले. या दाेघांनी शानदार कामगिरी करून कांगारूंना पहिल्या डावात गुंडाळण्यात महत्त्वाचे याेगदान दिले. यामध्ये अँडरसनने दाेन अाणि ब्राॅडने एक विकेट घेतली.