आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes: England Defeated Australia By 169 Runs In First Test

अॅशेस : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या कसोटीत १६९ धावांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्डिफ - यजमान इंग्लंडने पहिल्या अॅशेस कसोटीत पाहुण्या ऑस्ट्रेलियाला दणका देत शनिवारी तब्बल १६९ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४१२ धावांचे लक्ष्य िदले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात अवघ्या २४२ धावांत धुव्वा उडाला. ऑस्ट्रेलियाकडून तळाचा फलंदाज मिशेल जॉन्सन (७७) आणि डेव्हिड वॉर्नर (५२) यांनी अर्धशतके ठोकून झुंज दिली. इतरांनी निराशा केली.

तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा दुसरा डाव सर्वबाद २८९ धावांत आटोपला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ४१२ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाच्या हाती दोन दिवस होते. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ८६ चेंडूंत ५२ धावा काढल्या. मात्र, इतर फलंदाज टिकू शकले नाही. सलामीवीर क्रिस रोजर्स १० धावा काढून बाद झाला. भरवशाचा स्टीव्हन स्मिथ ३३, कर्णधार मायकेल क्लार्क अवघ्या ४, तर वॉटसन १९ आणि हॅडिन ७ धावा काढून परतले.
गोलंदाजांनी पाडले खिंडार
जगप्रसिद्ध ऑस्ट्रेलियाच्या मजबूत फलंदाजी फळीला इंग्लंडच्या गोलंदाजांनी खिंडार पाडले. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज ब्रॉडने रोजर्स, स्मिथ आणि क्लार्क या तिघांना, तर फिरकीपटू मोईन अलीने वॉर्नर, ब्रेड हॅडिन आणि हॅझलवूड यांना बाद केले. वूडने क्रिस वोक्स आणि शेन वॉटसनचा अडथळा दूर केला. रुटने जॉन्सन आणि स्टार्क यांना तंबूत परतवले.