आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेस :इंग्लंड टीमची विजयी ‘बेल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहॅम - यजमान इंग्लंडने अापल्या घरच्या मैदानावरील वर्चस्व अबाधित ठेवत अाॅस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेत २-१ ने अाघाडी मिळवली. यजमान संघाने मालिकेतील तिसऱ्या कसाेटीत तिसऱ्याच दिवशी ८ गड्यांनी अाॅस्ट्रेलियावर मात केली. यासह यजमान टीमला अाघाडी घेता अाली. स्टीव्हन फिनपाठाेपाठ (६/७९) फलंदाज इयान बेल (नाबाद ६५) अाणि ज्याे रूट (नाबाद ३८) यांनी उल्लेखनिय कामगिरीच्या बळावर यजमान टीमने तिसरी कसाेटी अापल्या नावे केली. अाता नाॅटिंगहॅममध्ये ६ अाॅगस्टपासून चाैथ्या कसाेटीला प्रारंभ हाेईल.

फीनच्या शानदार गाेलंदाजीच्या बळावर इंग्लंडने पाहुण्या कांगारूंना दुसऱ्या डावात अवघ्या २६५ धावांत राेखण्याची शानदार कामगिरी साधली. त्यानंतर इंग्लंडने अावाक्यातले १२१ धावांचे लक्ष्य दाेन गड्यांच्या माेबदल्यात गाठून तिसरी कसाेटी जिंकली. इयान बेलने ९० चेंडूंचा सामना करताना १० चाैकारांच्या अाधारे नाबाद ६५ धावा काढल्या. त्याला साथ देणाऱ्या रूटने ६३ चेंडूंत नाबाद ३८ धावा काढून विजयात माेलाचे याेगदान दिले.
छायाचित्र: तिसऱ्या कसाेटीतील विजयानंतर जल्लाेष करताना इंग्लंडचा इयान बेल अाणि ज्याे रुट.