आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेस मालिका: ऑस्ट्रेलियावर डावाने पराभवाचे सावट! ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात ७ बाद २४१

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉटिंघम- इंग्लंडविरुद्ध प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेतील चाैथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर डावाने पराभवाचे सावट निर्माण झाले आहे. लाजिरवाणा पराभव टाळण्यासाठी कंबर कसलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी ७ बाद २४१ धावांची खेळी केली. मात्र, तरीही ऑस्ट्रेलिया टीम ९० धावांनी पिछाडीवर आहे. अद्याप त्यांच्याकडे ३ विकेट शिल्लक आहेत. वोग्स (नाबाद ४८) आणि स्टार्क (नाबाद ०) मैदानावर खेळत आहेत. डेव्हिड वॉर्नर (६४) व रॉजर्स (५२) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या दिवशीही स्टोकमुळे ऑस्ट्रेलियाला यश मिळाले नाही. तत्पूर्वी इंग्लंडने ३९१ धावांवर पहिला डाव घोषित केला. यासह
इंग्लंडला ३३१ धावांची आघाडी घेता आली.

बेन स्टोकने घेतले पाच बळी
पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने कांगारूंचा धुव्वा उडवला. आता पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात बेन स्टोक अडसर ठरत आहे. स्टोकने शानदार गोलंदाजी करताना पाच हुकमी एक्के तंबूत पाठवले. त्याने सलामीवीर रॉजर्स, वॉर्नर, मार्श, नेवेल्ली आणि जॉन्सनला बाद केले. त्याने १६ षटकांत ३५ धावा देत ५ बळी घेतले.