आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटसनला आणखी एक संधी मिळायला हवी... मॅकग्राकडून शेन वाॅटसनची पाठराखण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - इंग्लंडविरुद्ध प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसाेटीतील पराभवानंतर टीकेला सामाेरे जात असलेल्या अाॅलराउंडर शेन वाॅटसनची अाॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गाेलंदाज ग्लेन मॅकग्राने पाठराखण केली. वाॅटसनला पुन्हा एक संधी दिली जावी,अशी मागणीही त्याने केली. इंग्लंडने पहिल्या कसाेटीत अाॅस्ट्रेलियावर १६९ धावांनी मात केली. अाता गुरुवारपासून मालिकेतील दुसऱ्या कसाेटीला प्रारंभ हाेणार अाहे.

‘वाॅटसन हा प्रतिभावंत खेळाडू अाहे. लाॅर्ड‌्सवर हाेणाऱ्या दुसऱ्या कसाेटीसाठी त्याला अजून एक संधी दिली जावी, असे माझे मत अाहे. दुदैवाने ताे पहिल्या कसाेटीच्या दाेन्ही डावांत (३० अाणि १९ धावा) पायचीत झाला. निवड समिती वाॅटसनवर दया दाखवेल, असे वाटत नाही, असेही मॅकग्रा म्हणाला.