आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेस मालिका: यजमान इंग्लडला विजयाची संधी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहॅम - अॅशेस मालिकेतील तिस-या कसोटीत यजमान इंग्लंडला विजयाची संधी आहे. इंग्लंडने अँडरसनच्या भेदक गाेलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या १३६ धावांवर राेखले. इंग्लंड पहिल्या डावात मोठी आघाडी घेईल असे वाटत असताना २८१ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. इंग्लंडने पहिल्या डावात १६४ धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात करत दुस-या डावात दुस-यादिवसअखेर गुरुवारी ७ बाद १६८ धावा काढल्या. यासह कांगारूंनी २३ धावांची अाघाडी घेतली. पीटर निवेली (३७) अाणि मिशेल स्टार्क (७) खेळत अाहेत.

कालच्या ३ बाद १३३ धावांच्या पुढे खेळताना इंग्लंडचा सात फलंदाजांनी केवळ १६४ धावांची भर घातली. कालच्या नाबाद जो रूटने अर्धशतक साजरे केले. त्याने ७५ चेंडूंत ९ चौकार आणि १ षटकार खेचत ६३ धावा केल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या अष्टपैलू मोईन अलीने ७८ चेंडूंत ५९ धावा काढल्या. हॉझलवूडने अलीची विकेट काढली. ऑस्ट्रेलियाकडून हॉझलवूड आणि लायनने प्रत्येकी ३ तर मिशेल स्टार्क व जॉन्सनने प्रत्येकी २ गडी बाद केले.

डेव्हिड वॅार्नर चमकला
दुस-या डावात आस्ट्रेलियाने सलामीवीर क्रिस रॉजर्सची (६) विकेट गमावल्यानंतर सावध सुरुवात केली. दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने चमकला. त्याने एकाकी झुंज देत संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्याने ६२ चेंडूंत ११ चाैकारांच्या अाधारे संघाकडून सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. या वेळी त्याला साथ देणा-या स्मिथ (८), क्लार्क (३), वाेग्स (०) यांना फार काळ अाव्हान टिकवता अाले नाही.
छायाचित्र: दुसऱ्या डावात अाॅस्ट्रेलियाच्या पीटरला बाद केल्याची अपील करताना इंग्लंडचा फिन.